नवी दिल्ली : महिला हक्क कार्यकत्र्या आणि कवी तसेच लेखिका कमला भसीन यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी येथे निधन  झाले. महिला कार्यकत्र्या कविता श्रीवास्तव यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की पहाटे ३ वाजता भसीन यांची प्राणज्योत मालवली. भसीन या भारतातील स्त्री चळवळीचा बुलंद आवाज होता. दक्षिण आशियाई देशांतील महिलांच्या हक्कांसाठीही त्या कार्यरत होत्या.

   श्रीवास्तव यांनी म्हटले आहे, की कमला भसीन यांचे २५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता निधन झाले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आयुष्य आनंदात घालवले. कमला या सतत सर्वांच्या हृदयात घर करून राहतील. पुरुषसत्ताक व्यवस्थेविरोधात त्यांनी  दिलेली हाक लोकप्रिय ठरली होती. नेटीझन्सनी भसीन यांच्या निधनावर ट्विटरच्या माध्यमातून दु: ख व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण यांनी सांगितले, की कमला भसीन या महिला हक्क कार्यकत्र्याच होत्या असे नाही, तर त्या दानशूरही होत्या. लोककल्याणकारी अशा अनेक संस्थांना त्यांनी मदत केली. त्यात हिमाचल प्रदेशातील जागोरी व राजस्थानातील स्कूल ऑफ डेमोक्रसी या संस्थांचा समावेश आहे. त्यांची उणीव सतत जाणवत राहील.  काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे, की महिला हक्क चळवळीचा बुलंद आवाज शांत झाला आहे. म् त्या अद्वितीय अशा कवयित्रीही होत्या. इतिहासतज्ज्ञ एस. इरफान हबीब यांनी सांगितले,की कमला भसीन यांच्या मृत्यूची वार्ता  दु:खद आहे.