Kamala Harris vs Trump Who Won Presidential Debate : अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’ची (अध्यक्षपदाच्या उमेदवारांमधील वादविवाद) बरीच चर्चा होत असते. अमेरिकेत द्विपक्षीय अध्यक्षीय लोकशाही असून तिथे प्रत्येक निवडणुकीआधी अध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये वादविवादाच्या तीन फेऱ्या होतात. अमेरिकेतील सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय विश्लेषक व पत्रकार या वादविवादाची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाची झलक पाहायला मिळते असं म्हटलं जातं. कारण, अमेरिकेतील बहुसंख्य मतदार या आधारावर त्यांच्या नेत्याची निवड करतात, निवडणुकीत कोणत्या नेत्याला व पक्षाला पाठिंबा द्यायचा ते ठरवतात.

प्रेसिडेन्शियल डिबेटची पहिली फेरी जून महिन्यात झाली. त्यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते व अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन विरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असा सामना झाला. पहिल्या फेरीत ट्रम्प बायडेन यांच्यावर वरचढ ठरले. त्यापाठोपाठ काल (मंगळवार, १० सप्टेंबर) प्रेसिडेन्शियल डिबेटची दुसरी फेरी पार पडली. यावेळी डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सामना झाला. वादविवादाच्या दुसऱ्या फेरीत मात्र डेमोक्रॅट्सच्या कमला हॅरिस ट्रम्प यांच्यापेक्षा वरचढ ठरल्या.

New Toll Tax Rules : महामार्ग, द्रुतगती मार्गांवर २० किमीपर्यंत टोल माफ, फास्टॅगचीही गरज नाही; जाणून घ्या नवीन नियम
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Vinesh Phogat slams PT Usha
Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप
Kirit Somaiya
Kirit Somaiya : पक्षाचा आदेश धुडकावल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “साडेपाच वर्ष…”
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली

हॅरिस की ट्रम्प, कोण ठरलं वरचढ?

एबीसी न्यूज या वृत्तवाहिनीने वादविवादाची दुसरी फेरी आयोजित केली होती. कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ९० मिनिटे विविध मुद्द्यांवर शाब्दिक युद्ध झालं. अमेरिकेची अर्थव्यवस्था, गर्भपाताचा हक्क, इस्रायल-गाझा व रशिया-युक्रेन युद्ध, स्थलांतरीतांचे प्रश्न यावर दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडली. दरम्यान, सीएनएन व एसएसआरएसने प्रेसिडेन्शियल डिबेटनंतर एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणानुसार वादविवाद पाहणाऱ्या अर्ध्याहून अधिक लोकांचं असं म्हणणं आहे की कमला हॅरीस या ट्रम यांच्यापेक्षा वरचढ होत्या. त्यांनी हे डिबेट जिंकलं आहे. सीएनएन व एसएसआरएसच्या सर्वेक्षणानुसार डिबेट पाहणाऱ्या ६३ टक्के लोकांनी म्हटलं आहे की या वादविवादात कमला हॅरिस जिंकल्या. तर, ३७ टक्के लोकांचं म्हणणं आहे की या वादविवादात ट्रम वरचढ होते.

हे ही वाचा >> India US Relations : “दर पाच मिनिटांनी भारताच्या निष्ठेची परीक्षा…”, मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांचं वक्तव्य

वादविवादाच्या दुसऱ्या फेरीनंतर चित्र बदललं

सीएनएनच्या सर्वेक्षणानुसार वादविवादाला सुरुवात होण्यापूर्वी ५० टक्के लोक हॅरिस यांच्या बाजूने होते, तर ५० टक्के लोक ट्रम्प यांचं समर्थन करत होते. मात्र, वादविवादाच्या पहिल्या फेरीनंतर ६७ टक्के लोकांनी ट्रम्प यांना पसंती दिली होती, तर ३३ टक्के लोकांनी बायडेन यांना पसंती दर्शवली होती. मात्र वादविवादाच्या दुसऱ्या फेरीनंतर हे चित्र बदललं आहे. दुसऱ्या फेरीनंतर ६३ टक्के लोकांनी म्हटलं आहे की कमला हॅरिस ट्रम्प यांच्यापेक्षा वरचढ ठरल्या, तर ट्रम्प यांना केवळ ३७ टक्के लोकांनी पसंती दर्शवली.

हे ही वाचा >> Hindenburg on Madhabi Puri Buch: “माधबी पुरी बूच गप्प का?”, ‘हिंडेनबर्ग’ने सेबीच्या अध्यक्षांवर नवा आरोप करत उपस्थित केला सवाल

जून महिन्यात झालेल्या वादविवादाच्या पहिल्या फेरीत विद्यमान अध्यक्ष जो बायडेन सहभागी झाले होते. मात्र २१ जुलै रोजी जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाने विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केलं.