कंगना रणौतने अंदमानातील सेल्युलर जेलला दिली भेट ; स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल म्हणाली…

कंगना रणौत ही नेहमीच विविध कारणांमुळे किंवा तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते.

(फोटो सौजन्य -इंन्स्टाग्राम)

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच विविध कारणांमुळे किंवा तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. आता तिने इन्स्ट्रग्रामवर केलेली एक पोस्ट सध्या सर्वत्र जोरदार चर्चेत आहे. ज्यामध्ये तिने अंदमानातील सेल्युलर जेलला भेट दिल्याचे फोटो व त्यासोबत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काही मजकूर टाकलेला आहे.

PHOTOS : सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर कंगना म्हणाली ; “मी हादरून गेले होते, जेव्हा…”

आपल्या पोस्टमध्ये कंगना रणौत हिने म्हणते, “मी आज अंदमान बेटावर आल्यावर, पोर्ट ब्लेअर येथील सेल्युलर जेलमधील काला पाणी सेलला भेट दिली. त्या ठिकाणी वीर सावरकरांना कैदेत ठेवण्यात आले होते. मी मनापासून हादरून गेले होते… जेव्हा अमानुषता शिगेला पोहोचली होती, तेव्हा सावरकरांच्या रूपाने मानवता शिखरावर पोहोचली आणि अमानुषतेचे भय न बाळगता नजरेला नजर भिडवत ते धैर्याने क्रूर शिक्षेला सामोरे गेले. प्रत्येक क्रूर कृत्याचा त्यांनी निर्धाराने विरोध केला.”

तसेच, “ब्रिटिशांना सावरकरांची किती भीती वाटत असावी याची कल्पना आपल्याला येते, ती त्यांना देण्यात आलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवरून. समुद्राच्या मधोमध असलेल्या या लहानशा बेटातून पळून जाणे अशक्य होते, तरीही त्यांनी त्यांना पायात साखळदंड घालून एक जाड तटबंदीचा तुरुंग बांधला आणि त्यामधील एका लहानशा खोलीत बंदिस्त केले. जणू काही त्या अथांग सागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यावर स्वार होऊन ते उडून जाणार होते. यावरून ब्रिटिशांचा भ्याडपणा दिसून येतो.काला पाणी तुरूंगातील ती खोली हेच स्वातंत्र्याचे खरे सत्य आहे. आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये मात्र हे वास्तव कधी शिकवले जात नाही. मी कोठडीत ध्यान करून वीर सावरकरांबद्दल कृतज्ञतेने मनापासून आदर व्यक्त केला…” असं कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

याचबरोबर, “ स्वतंत्रता संग्रामातील या खऱ्या नायकास माझे कोटी कोटी प्रणाम…जय हिंद…” असं देखील कंगना आपल्या पोस्टमध्ये शेवटी म्हणते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut visits andaman cellular jail msr

ताज्या बातम्या