सीपीआय नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुर्वी कन्हैया कुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये जाणार, अशा चर्चांना उधान आलं होत. दरम्यान, कन्हैया कुमार आणि  गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी हे २ ऑक्टोबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. एनडीटीव्हीने काँग्रेस सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. 

उत्तर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून काँग्रेसने मेवानीला उमेदवारी न देता मागच्या विधानसभा निवडणुकीत मदत केली होती. दरम्यान, कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांना सोबत घेऊन काँग्रेस आपली नवीन राजकीय खेळी सुरू करणार आहे.

बिहारमध्ये काँग्रेसला सावरण्याची संधी

अनेक काँग्रेस नेत्यांचा असा विश्वास आहे की कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये सावरण्याची संधी मिळू शकते. बिहारमध्ये गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस काही खास कमाल करु शकलेली नाही. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही, मित्रपक्ष आरजेडी आणि सीपीआय (एमएल) च्या तुलनेत काँग्रेसने वाईट कामगिरी केली. काँग्रेसने लढवलेल्या ७० पैकी केवळ १९ जागा जिंकल्या. आरजेडीने १४४ जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागा जिंकल्या, तर सीपीआय (एमएल) ने १९ पैकी १२ जागा जिंकल्या जिथे त्यांनी उमेदवार उभे केले होते.

काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, पक्षाला विश्वास आहे की कुमार आणि मेवाणी यांच्या प्रवेशामुळे नव्या दृष्टीने पक्षाला चालना मिळेल. कारण गेल्या दोन वर्षांपासून पक्षाला तरुण नेत्यांची गरज होती. ज्योतिरादित्य शिंदे, सुष्मिता देव, जितिन प्रसाद आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्ष सोडल्यानंतर ती गरज अधिक भासू  लागली आहे.

अशा स्थितीत कन्हैयाकडून पक्षाला काय फायदा होणार, असाही प्रश्न पक्षांतर्गत वेगाने वाढू लागला आहे. कन्हैयाचा सीपीआय नेतृत्वावर राग आहे. अशा परिस्थितीत जर त्याला काँग्रेसचे व्यासपीठ मिळाले तर त्यांचा राजकीय वजन वाढेल. पण पक्षाला काय फायदा होईल, काँग्रेस या नफा -तोट्याचे आकलन करण्यात व्यस्त आहे.

कन्हैयामध्ये तरुण नेतृत्व पाहत आहे काँग्रेस

काँग्रेसला कन्हैयामध्ये एका तरुण नेत्याची प्रतिमा दिसत आहे, जे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करतो आणि पूर्ण निर्दोषतेने आपले म्हणणे मांडतो. नेतृत्वाच्या संकटाचा सामना करणारी काँग्रेस कन्हैयाच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकते. पण डाव किती प्रभावी ठरेल हे वेळच ठरवेल.