दिल्लीतील कंझावाला येथे कारखाली आलेल्या अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेलं होतं. या अपघातात अंजलीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून गाडी मालक आशुतोषला अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा – Delhi Accident: कंझावाला तरूणी अपघात आणि मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तातडीने अहवाल सादर करावा-अमित शाह

Husband Seeks Court Intervention, habeas corpus, Eloped with Facebook Friend, wife escaped with Facebook Friend, high court nagpur,
“बायको परत मिळवून द्या, फेसबुक मित्राबरोबर पळाली…’ नवऱ्याची उच्च न्यायालयात धाव
College Girl Murdered by Friends for Ransom
धक्कादायक : विमाननगर भागातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मित्राकडूनच खंडणीसाठी खून
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

आरोपींना वाचवण्याचा आशुतोषवर आरोप

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी १ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजून ३३ मिनिटांनी रोहिणीतील सेक्टर १ मध्ये पोहोचले होते. यावेळी आशुतोषही तिथे उपस्थित होता. आरोपींनी त्यापूर्वीच फोन करून आशुतोषला अपघाताबाबत माहिती दिली होती. त्यामुळे त्याने आरोपींना पळून जाण्यासाठी ऑटोची व्यवस्था करून दिली होती.

हेही वाचा – चीनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ; बीजिंगमध्ये रुग्णशय्या उपलब्ध नाहीत

”बलात्काराचे कोणतेही पुरावे नाही”

दरम्यान, याप्रकरणात एकूण सात आरोपींचा सहभाग असल्याची माहितीही दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच यापैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू असल्याचेही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. याबरोबरच बलात्काराचे कोणतेही पुरावे नाहीत, असेही दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.