उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये १० दिवसांपूर्वी पीतांबरा माता मंदिरात चोरी झाली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास केला आणि याप्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. या घटनेचा तपास करताना पोलिसांना माहिती मिळाली की, चोरांनी आधी मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर ओवाळणीत १० रुपये टाकले. त्यानंतर मध्यरात्री मंदिरातील देवीचे सोन्या-चांदीचे दागिने, दानपेटीतले पैसे घेऊन चोर फरार झाले.

पोलिसांनी सांगितले की, फहीम नावाचा आरोपी आधी मंदिरात आला होता. त्याने देवीचं दर्शन घेऊन ओवाळणीत १० रुपये टाकले होते. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक करून रोख रक्कम जप्त केली आहे.

Kalmana, murder,
नागपूर : वडिलांनी सांगितले जाऊ नको, त्याने ऐकले नाही, अखेर… दगडाने ठेचून…
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
in nagpur Suicide attempt by young man due to family reasons police save him
कौटुंबिक कारणातून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, पण देवदुतासारखे धावून आले पोलीस; दरवाजा तोडून…
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

देवीच्या दागिन्यांसह २० लाखांची चोरी

मिळालेल्या माहितीनुसार कानपूरच्या बिठूरमध्ये १३ जानेवारी रोजी प्राचीन पीतांबरा देवीच्या मंदिरात चोरी झाली होती. चोर देवीचे दागिने आणि दानपेटीसह २० लाख रुपयांची चोरी करून फरार झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणाचा क्राईम ब्रँचकडून तपास सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी चार आरोपींना अटक केलं.

पोलिसांनी सांगितलं की, कन्नौजमधील रहिवासी कुंवर पाल याने त्याच्या साथीदारांसह मंदिरात चोरी केली होती. या चोरांच्या टोळीने आधी मंदिरात फिरून रेकी केली. त्यानंतर रात्री देवीचे दागिने आणि दानपेटी घेऊन ते फरार झाले.

चोरांच्या टोळीत दोन सोनार

चोरी केल्यानंतर आरोपींनी कन्नौज येथे जाऊन सगळे दागिने वितळवले. पोलिसांनी याप्रकरणी या टोळीचा म्होरख्या कुंवर पाल याच्यासह चार जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन सोनारांचा देखील समावेश आहे. या सोनारांनी देवीचे दागिने वितळवले होते. पोलिसांनी या चोरांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने आणि चांदी जप्त केली आहे.

चोरांच्या रडारवर मंदिरं

दागिने चोरीच्या या प्रकरणातला आरोपी फहीम आणि त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे. कुंवर पाल आणि त्याची टोळी मंदिरांमध्ये चोरी करते. याआधी त्यांनी मध्य प्रदेश आणि घाटमपूर येथील मंदिरांमध्ये चोरी केली होती. त्याचं नाव आतापर्यंत २६ गुन्ह्यांमध्ये नोंदवण्यात आलं आहे. कुंवर पालने सांगितलं की, फहीमने पीतांबरा माता आणि साई धामचं दर्शन केलं होतं. त्याने देवीच्या मंदिरात ओवाळणीत १० रुपये टाकले होते. पोलीस आता फहीमचा शोध घेत आहेत.