scorecardresearch

Premium

रेल्वे अपघातामुळे भावी वधूवर तिच्या वडिलांचा शोध घेण्याची वेळ

इंदूर-पाटणा एक्सप्रेसला अपघात झाल्यानंतर भावी वधूचे वडिल बेपत्ता

रेल्वे अपघातामुळे भावी वधूवर तिच्या वडिलांचा शोध घेण्याची वेळ

इंदूर-पाटणा एक्सप्रेसला अपघात झाल्याने २० वर्षांच्या रुबी गुप्तावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लवकरच विवाह बंधनात अडकणाऱ्या रुबीचे वडिल अपघातानंतर बेपत्ता झाले आहेत. रेल्वे अपघातात रुबीच्या एका हाताचे हाड मोडले आहे. मात्र या स्थितीतही रुबी बेपत्ता वडिलांचा शोध घेते आहे.

रुबीचा विवाह १ डिसेंबरला होणार आहे. याच विवाह सोहळ्यासाठी रुबी इंदूरहून आझमगढमधील मऊला जात होती. भावंडांमध्ये मोठी असलेली रुबी दोन बहिणी आणि एका भावासह प्रवास करत होती. वडिल राम प्रसाद गुप्ता आणि कुटुंबाचे निकटवर्तीय असलेले राम प्रमेश सिंह हेदेखील या भावंडांसह प्रवास करत होते.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

‘मी वडिलांना प्रत्येक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुठेच सापडले नाहीत. काहींनी मला रुग्णालय आणि शवागारात जाऊन वडिलांचा शोध घेण्यास सांगितले. मात्र आता मी काय करु, हेच मला समजत नाही. आता माझे लग्न तरी ठरलेल्या दिवशी होणार आहे की नाही, हेदेखील माहित नाही. आता मला माझ्या वडिलांचा शोध घ्यायचा आहे,’ अशी करुण कहाणी रुबीने सांगितली. रुबी तिच्यासोबत लग्नाचे कपडे आणि दागिने घेऊन जात होती. मात्र आता यातील कोणतेच सामान तिला सापडत नाही आहे. रुबीने आतापर्यंत या प्रकरणी कोणतीही तक्रारदेखील नोंदवली नाही आहे.

रविवारी पहाटे उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ इंदूर-पाटणा एक्सप्रेसला अपघाता झाला. या अपघातात एक्सप्रेसचे १४ डबे रुळांवरुन घसरले. हा अपघात नेमका का झाला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघातात आतापर्यंत १०० पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या अपघातावेळी गाड्यांचे डबे एकमेकांना आदळले. त्यामुळे प्रवासी एकमेकांवर पडले. प्रवासी गाढ झोपेत असताना हा भीषण अपघात झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-11-2016 at 16:31 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×