लखनऊ : उत्तर प्रदेशात करोनाच्या कप्पा विषाणूचे दोन रुग्ण सापडले असून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजने १०९ नमुन्यांचे जनुकीय सर्वेक्षण केले होते.

डेल्टा प्लस विषाणूचा प्रकार १०७ नमुन्यांमध्ये दिसून आला होता. कप्पा विषाणू हा दोन नमुन्यात सापडला असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. डेल्टा प्लस हा नवीन प्रकार नाही. जनुकीय क्रमनिर्धारणाने तो शोधून काढणे शक्य आहे. सध्या उत्तर प्रदेशातील संसर्ग दर ०.०४ टक्के आहे.

अतिरिक्त आरोग्य सचिव अमित मोहन यांनी सांगितले, की यापूर्वीही करोनाच्या विविध प्रकारांचे विषाणू सापडले आहेत पण त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. करोना विषाणूच्या या प्रकारांवर उपचार उपलब्ध आहेत.  करोना साथ कुंभमेळ्यानंतर पुन्हा  आली, पण तोपर्यंत कप्पा व डेल्टा प्लस या विषाणूंचे प्रकार समोर आले नव्हते.