लष्करी कारवाईच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले कारगिल हे भारताच्या हद्दीतील ठिकाण पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून बळकविण्याचा प्रयत्न केला होता़  १९९९ सालच्या पाक लष्कराच्या या घुसखोरीबद्दल आपण पूर्णत: अनभिज्ञ असल्याचा दावा तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केला होता़  परंतु, पाकचे निवृत्त लेफ्टनंट जनरल शाहिद अझीज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शरीफ यांचा दावा फोल ठरला आह़े
कारगिलच्या कारवाईत पाकिस्तानी सैनिकही सहभागी झाले होते आणि हे पाकिस्तानी सैन्याचे वेडे साहस होत़े  तसेच हा घुसखोरीचा निर्णय, लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ, लेफ्टनंट जनरल मोहम्मद अझीज, उत्तर विभागाचे फोर्स कमांडर लेफ्ट़ जऩ  जावेद हसन आणि लेफ्ट़ जऩ  मेहमूद अहमद या चौघांचाच होता़  इतर लष्कराला त्याची थोडीही कल्पना नव्हती, अशी खळबळजनक माहिती अझीज यांनी येथील ‘डॉन’ या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आह़े
शरीफ यांना नेमकी काय माहिती पुरविण्यात आली होती, याची आपल्याला कल्पना नाही़  परंतु या कारवाईबाबत ते पूर्णत: अनभिज्ञ नव्हते, हे मात्र नक्की, असे अझीज सांगतात़  दुसऱ्या एका जनरलशी बोलताना, तुम्ही आम्हाला काश्मीर कधी मिळवून देणार, असा प्रश्न शरीफ यांनी विचारला होता़  त्यामुळे शरीफ यांना कारवाईबद्दल माहिती असल्याचे सिद्ध होते, असे अझीज यांनी पुढे म्हटले आह़े
कारगिल प्रश्नावर पाक लष्कराच्या उच्चाधिकाऱ्याकडून पहिल्यांदाच अशा प्रकारची सविस्तर आणि मोकळेपणाने टिप्पणी करण्यात आल्याचे आतापर्यंतच्या नोंदी सांगतात़