जम्मू-काश्मीरमध्ये कारगिलमध्ये तापमान सर्वात कमी राहिले असून ते गोठणबिंदूच्या खाली गेले आहे. उन्हाळ्यातील राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये थंडी थोडी कमी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत तेथे कोरडे हवामान असणार आहे. कारगिलमध्ये रात्रीचे तापमान तीन अंशांनी उतरले व ते उणे १८.४ अंश सेल्सियस झाले. लेह येथे उणे १३.७ अंश सेल्सियस तापमान होते  ते आधी उणे ८.८ अंश सेल्सियस होते. श्रीनगर येथे उणे १ अंश सेल्सियस तापमान होते. तेथे सोमवारी १.५ अंश सेल्सियस तपमान होते. दिवसाचे तापमान १३.२ अंश सेल्सियस होते. पहलगाम हिल रिसॉर्ट येथे उणे ९ अंश तपमान होते. सोमवारी रात्रीपेक्षा ते २.६ अंशांनी घसरले.
उत्तर काश्मीरमध्ये गुलमर्ग स्कीइंग रिसॉर्ट येथे  परदेशातून र्पयटक आले असून तेथे रात्रीचे तापमान थोडे वाढले आहे ते उणे ७.२ अंश सेल्सियस होते. काझीगुंड येथे उणे १.८ अंश तापमानाची नोंद झाली. कुपवाडा जिल्ह्य़ात उणे ३.४ अंश तपमान होते. कोकेमार्ग रिसॉर्ट येथे तापमान उणे ०.६ अंश सेल्सियस होते ती आधीच्या रात्री उणे ०.१ अंश होते.  येत्या २४ तासांत हवामान कोरडे राहील व चार दिवसांत हवामानामध्ये मोठा फरक पडणार नाही, असे हवामान खात्याच्या प्रवक्तयांनी सांगितले.