२६ जानेवारी रोजी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निलेश रक्शल्य यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही. दरम्यान शाळकरी मुलं पोलीस ठाण्यात बसले असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरुन संताप व्यक्त होताना दिसत आहे.
शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, चौथीच्या मुलांनी नाटकाच्या माध्यमातून देशात जी सध्या परिस्थिती आहे ती दर्शवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोपही शाळेकडून कऱण्यात आला आहे.
दरम्यान तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकात देशात जर सीएए आणि एनआरसी लागू झालं तर मुस्लिमांकडे देश सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही असं दाखवण्यात आलं आहे. आपण सोशल मीडियावर नाटकाचा व्हिडीओ पाहिल्याचं तक्रारदार निलेश रक्शल्य यांनी सांगितलं आहे. नाटकात विद्यार्थी नरेंद्र मोदींच्या फोटोवर हल्ला करताना दाखवण्यात आलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दोन धर्मांमध्ये तणाव वाढवण्यासाठी नाटक सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्याचं आरोपात म्हटलं आहे.