कर्नाटकातील भाजपाचे आमदार अरविंद लिंबावली यांनी एका महिलेला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बंगळुरुच्या वर्थुरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या समस्यांची लेखी तक्रार करण्यास गेलेल्या या महिलेसोबत भाजपा आमदाराने गैरवर्तन केले आहे. लिंबावली यांनी तुरुंगात डांबण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. ही महिला काँग्रेस कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे.

“२०२४ मध्ये भारत ‘जुमलेबाज मुक्त होणार”; जेडीयूचा पलटवार, भाजपाने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप

लिंबावली यांनी हातातील तक्रारींचे पत्र खेचून घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देखील या महिलेने केला आहे. “भाजपा आमदार अरविंद लिंबावली मला तुरुंगात डांबण्यास पोलिसांना वारंवार सांगत होते. जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर आमदारांसमोर उभे आहात. तुम्हाला आदर किंवा सन्मान आहे की नाही?”अशी प्रतारणा भाजपा आमदाराकडून करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

“पैसे भाजपाकडून घ्या काम ‘आप’चं करा”, केजरीवालांचं गुजरातमधील BJP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले, “सरकार आलं की…”

दरम्यान, या घटनेनंतर काही तास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप देखील या महिलेने केला आहे. हल्ला करण्याचा आमदारांचा हेतू होता, असेही या महिलेने म्हटले आहे. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घ्यावी, अशी मागणी कर्नाटकातील काँग्रेस आमदार दिनेश गुंडू राव यांनी केली आहे. भाजपा नेते उद्धट असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.