कर्नाटकमध्ये कॉलेजमध्ये आणि शाळांमध्ये येणाऱ्या मुस्लीम मुली हिजाब घालत असल्यावरून मोठा वाद सध्या निर्माण झाला आहे. यावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच आता भाजपाच्या एका आमदारांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महिलांच्या पोशाखामुळे बलात्काराच्या घटना घडतात असा दावा या आमदार महोदयांनी केला आहे. मात्र, काही वेळातच आपल्या विधानामुळे वाद निर्माण होऊ शकतो, हे लक्षात येताच सारवासारव करत मी महिलांचा आदर करतो म्हणत दिलगिरी देखील व्यक्त केली!

“महिलांचे काही पोषाख पुरुषांना उत्तेजित करतात”

कर्नाटकमध्ये हिजाबवरून वाद सुरू असताना कर्नाटकमधलेच भाजपा आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी हे विधान केलं आहे. प्रियांका गांधींनी महिलांनी काय परिधान करावं, हा त्यांचा अधिकार आहे, असं विधान केल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी नवी दिल्लीत बोलताना रेणुकाचार्य यांनी हे विधान केलं आहे.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
shivpal yadav
समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; बदायूमधून कोणाला मिळणार उमेदवारी?

“महाविद्यालये किंवा शाळांमध्ये शिकताना विद्यार्थ्यांनी गणवेश किंवा त्यांचं शरीर पूर्णपणे झाकलं जाईल असे कपडे घालायला हवेत. महिला परिधान करत असलेले काही कपडे पुरुषांना उत्तेजित करतात, त्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. हे योग्य नाही. कारण महिलांना आपल्या देशात आदर आहे, आपण महिलांना माता मानतो”, असं विधान रेणुकाचार्य यांनी केलं आहे.

प्रियांका गांधींवर निशाणा

दरम्यान, प्रियांका गांधींवर देखील त्यांनी टीका केली आहे. “प्रियांका गांधी या एक महिला आहेत, काँग्रेस नेत्या आहेत. आम्ही महिलांच्या मूलभूत अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. मुंबई आणि केरळ उच्च न्यायालयांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश सक्तीला मान्यता दिली आहे. विद्यार्थिनींसाठी बिकिनी शब्दाचा वापर करणं अयोग्य आहे”, असं देखील ते म्हणाले. महिलांच्या कपड्यांबाबत एम. पी. रेणुकाचार्य यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना टीका केली आहे.

दरम्यान, आपल्या विधानावर वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात येताच रेणुकाचार्य यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. “जर माझ्या विधानामुळे आपल्या भगिनी दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यासाठी नक्कीच माफी मागेन. मी महिलांचा आदर करतो”, असं ते म्हणाले.