“भीक मागण्यास मनाई असूनही…,” काँग्रेसची मोदींवर आक्षेपार्ह टीका; ‘अंगूठा छाप’ म्हटल्याने मोठा वाद

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करताना त्यांचा निरक्षर असा उल्लेख केला आहे. यामुळे सध्या भाजपा आणि काँग्रेस नेत्यांमध्ये घमासान सुरु आहे.

Narendra Modi, CBI, CVC, Corruption

कर्नाटकमध्ये दोन पोटनिवडणुकांच्या निमित्ताने प्रचार सुरु असून यावेळी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करताना त्यांचा निरक्षर असा उल्लेख केला आहे. यामुळे सध्या भाजपा आणि काँग्रेस नेत्यांमध्ये घमासान सुरु आहे.

“काँग्रेसने शाळा बांधल्या पण मोदी कधी शिक्षण घेण्यासाठी गेले नाहीत. काँग्रेसने प्रौढांसाठी शिकण्यासाठी योजनाही उभारल्या, मोदी तिथेही शिकले नाहीत. भीक मागण्यास मनाई असूनही उपजीविकेसाठी भीक मागण्याची निवड करणारे लोक आज नागरिकांना भिकारी होण्याकडे ढकलत आहेत. ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला भोगावं लागत आहे,” अशी टीका काँग्रेसने केील आहे.

काँग्रेसची ही टीका मोदींवर वैयक्तिक टीका असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. कर्नाटकमधील भाजपाचे प्रवक्ते मालविका अविनाश यांनी फक्त काँग्रेसच्या इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकतं अशी टीका केली आहे. तसंच यावर प्रतिक्रिया दिली जावी इतकीही याची किंमत नसल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेस प्रवक्ता लावण्य बल्लाल यांनी हे ट्वीट दुर्दैवी असून याची चौकशी केली जाईल असं सांगितलं आहे. मात्र त्यांनी हे ट्वीट माघारी घेण्याचा किंवा माफी मागण्याचा प्रश्न नसल्याचंही सांगितलं आहे.

कर्नाटकात ३० ऑक्टोबरला दोन ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. जनता दल सेक्यूलर आणि भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या या जागांवर निवडणुका होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karnataka congress angootha chhaap remark on pm narendra modi sparks political row sgy

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या