राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांचे पोस्टर फाडले, काँग्रेस नेत्याचा भाजपासह पोलिसांनाही जाहीर इशारा, म्हणाले "लक्षात ठेवा..." | Karnataka EX CM Siddaramaiah warns BJP Leaders over torn posters in Rahul Gandhi Bharat Jodo Yatra sgy 87 | Loksatta

राहुल गांधींसह इतर नेत्यांचे पोस्टर फाडले, काँग्रेस नेत्याचा भाजपासह पोलिसांनाही जाहीर इशारा, म्हणाले “लक्षात ठेवा…”

…तर भाजपा नेत्यांचं फिरणं मुश्कील होईल, काँग्रेस नेत्याचा जाहीर इशारा; म्हणाले “पुन्हा आमची सत्ता येणार हे पोलिसांनी लक्षात ठेवावं”

राहुल गांधींसह इतर नेत्यांचे पोस्टर फाडले, काँग्रेस नेत्याचा भाजपासह पोलिसांनाही जाहीर इशारा, म्हणाले “लक्षात ठेवा…”
…तर भाजपा नेत्यांचं फिरणं मुश्कील होईल, काँग्रेस नेत्याचा जाहीर इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांचे पोस्टर फाडल्यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांनी याप्रकरणी भाजपा नेत्यांना जाहीरपणे इशारा दिला आहे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेच स्वागत करण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र हे सर्व पोस्टर फाडून टाकण्यात आले असून, काँग्रेस नेत्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे.

“ते आमचे पोस्टर आणि फ्लेक्स फाडत आहेत. मला त्यांना इशारा द्यायचा आहे की, जर ते असंच करत राहिले तर त्यांना कर्नाटकमध्ये मोकळेपणाने फिरता येणार नाही. राज्यातील आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तेवढी ताकद आहे हे लक्षात ठेवा,” अशी धमकीच सिद्धरमय्या यांनी दिली आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट ; मल्लिकार्जुन खर्गे झाले IN तर दिग्विजय सिंह OUT!

यावेळी त्यांनी आपण बुधवारी आणि गुरुवारी पोलिसांशी चर्चा केली होती अशी माहिती दिली. ते म्हणाले “पुढील सहा महिन्यात सरकार बदलणार आहे, हे पोलिसांनी लक्षात ठेवावं. काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे आणि मी पोलिसांनाही हाच इशारा देत आहे”.

राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा शुक्रवारी कर्नाटकमध्ये पोहोचली. यावेळी सिद्धरमय्या यांच्यासहित इतर काँग्रेस नेते राज्याच्या सीमेवर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, मल्लिकार्जून खर्गेही निवडणुकीच्या रिंगणात

संबंधित बातम्या

“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
Ravish Kumar Resigned: “..हाच माझा नवा पत्ता”, रवीश कुमार यांची NDTVतून बाहेर पडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; पुढील वाटचालीचे संकेत!
स्वत: भाजपाच्या उमेदवार पण सासरेबुवांकडून काँग्रेसचा प्रचार! रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा म्हणाल्या “माझे सासरे…”
Gujarat Election: “मोदी गेले म्हणजे…”; रवींद्र जडेजानं शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा VIDEO
धक्कादायक ! दोन कोटी रुपयांच्या विम्यासाठी पत्नीलाच दिली मारण्याची सुपारी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Second Hand Car खरेदी करण्याचा विचार करताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होणार…
एड्सग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ‘ई निरंतर’ सेवा
…अन् ‘ती’ दोन वर्षांनंतर पालकांना भेटली; टाळेबंदीत पश्चिम बंगालमधून हरवलेल्या मुलीची कथा
“काहीतरी काय? हे बाहेर पडले…”, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला दिलं खोचक प्रत्युत्तर!
“…तोपर्यंत भाजपाचा कुठलाही नेता उभ्या महाराष्ट्रात फिरू शकणार नाही”, शिवसेनेचा जाहीर इशारा