scorecardresearch

Viral Video : शेतकऱ्याची पंतप्रधान मोदींच्या फोटोसोबत ‘मन की बात’, फोटोचा मुका घेत निरागसपणे म्हणाला…

कर्नाटकमधल्या एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो मोदींच्या फोटोसोबत बोलताना दिसतोय.

farmer talk with PM Modi
शेतकऱ्याने केली पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 'मन की बात' (PC : Twitter/@MOHANDASKAMATH3)

कर्नाटकमधल्या एका शेतकऱ्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये एक शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोशी बोलताना दिसत आहे. तो त्याच्या मनातल्या गोष्टी पंतप्रधानांच्या फोटोसमोर व्यक्त करत आहे. तसेच तो मोदींचं कौतुक करताना दिसतोय. तो आधी फोटोशी बोलला आणि नंतर खूप निरागसपणे त्याने पंतप्रधानांच्या फोटोचा मुकादेखील घेतला. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

मोहनदास कामत नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींना यावर टॅगदेखील केलं आहे. काही युजर्सने यावर कमेंट करून म्हटलं आहे की, सामन्यांच्या मनात पंतप्रधानांसाठी किती प्रेम आहे ते यातून दिसतंय. चंद्रू डीएल नावाच्या एका युजरने कमेंट केली आहे की, साफ मनातून बाहेर पडलेले शब्द ऐकून माझं मन भरून आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सामान्य नागरिकाच्या मनात आहेत. तर सन्यनारायण नावाच्या एका युजरने लिहिलं आहे की, आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपात एक महान नेता मिळाला आहे.

शेतकरी काय म्हणतोय?

या व्हिडीओमध्ये तो शेतकरी म्हणतोय की, “मला पूर्वी १,००० रुपये मिळायचे. तुम्ही (नरेंद्र मोदी यांनी) आणखी ५०० रुपये दिले. आमच्या उपचारांसाठी ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. तुम्ही हे जग जिंकणार आहात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 16:37 IST

संबंधित बातम्या