कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते येदियुरप्पा यांचं हेलिकॉप्टर लँडिंग होताना एक निष्काळजीपणाचा प्रकार घडला आहे. हेलिकॉप्टर लँडिंग होत असताना हवेच कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि धूळ उडाली आहे. यामुळे हेलिकॉप्टर लँडिंग होण्यास अडचण झाली. परिणामी येदियुरप्पा लँडिंग न करताच निघून गेले.

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. खरं तर, येदियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगची व्यवस्था कलबुर्गी येथील जेवरगी येथे करण्यात आली होती. लँडिंगच्या ठिकाणी शेतात एक घर होतं.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
supriya sule marathi news, goa cm pramod sawant marathi news
“सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला
vina vijayan ed case
मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर ईडीची कारवाई; केरळमध्ये काय घडतंय?

हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या हवेमुळे कपडे आणि प्लास्टिकच्या पिशव्या हवेत उडू लागल्या. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरचे लँडिंग करणं धोकादायक ठरलं असतं. त्यामुळे वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर लँडिंग न करता परत नेलं. काही वेळाने लँडिंगची जागा साफ केल्यानंतर संबंधित ठिकाणी हेलिकॉप्टर उतरलं. कर्नाटकाच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा हे विजय संकल्प यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.