कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईल स्पीकरवर गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने यापूर्वी न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेच्या आधारे बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याचिकेत बसमधील आवाजाच्या त्रासावर निर्बंध आणण्याची मागणी केली होती. मोठ्या आवाजात गाणी आणि व्हिडिओ प्ले करण्यासाठी मोबाइल फोनचा वापर प्रतिबंधित करण्यात यावा, असे त्यात म्हटले आहे.




ही बाब विचारात घेऊन, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की बसमधील अधिकाऱ्यांनी लोकांना जास्त आवाजात गाणी वाजवू नये आणि सहप्रवाशांना त्रास होऊ नये अशी विनंती करावी.
“एखाद्या प्रवाशाने सूचना ऐकल्या नाहीत तर अधिकारी प्रवाशाला बसमधून उतरवू शकतात,” असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.