कर्नाटकातल्या दोन उच्चपदस्थ नोकरशहांमधील खासगी वाद आता चव्हाट्यावर आला आहे. आयपीएस अधिकारी डी. रुपा मौदगिल यांनी आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, सिंधुरी यांनी तीन पुरूष अधिकाऱ्यांना हो फोटो पाठवले होते. रुपा यांनी सिंधुरी यांच्यावर रविवारी तब्बल १९ आरोप केले आहेत. यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप देखील आहे. सिंदुरी यांनी उत्तर देताना म्हटलं आहे की, रुपा मौदगिल केवळ त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आयपीएस अधिकारी डी. रुपा मौदगिल आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांनी एकमेकींवर भ्रष्टाचार आणि आयपीएस अधिकाऱ्यांना खासगी फोटो पाठवले असल्याचे आरोप केले आहेत. सिंधुरी यांनी रविवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, रूपा त्यांच्याविरोधात खोटी आणि बदनामीकारक मोहीम चालवत आहेत. हीच त्यांची कार्यप्रणाली आहे. मी भारतीय दंडसंहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. त्यांनी मला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावरील फोटो आणि माझे व्हॅट्सअप स्टेटसचे स्क्रीनशॉट जमवले आहेत.

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
Prime Minister Narendra Modi criticism of the India front as rumors about CAA by the opposition
‘सीएए’बाबत विरोधकांकडून अफवा; पंतप्रधान मोदी यांचे ‘इंडिया’ आघाडीवर टीकास्त्र

सिधुरी म्हणाल्या रुपा यांनी आरोप केला आहे की, मी काही अधिकाऱ्यांना फोटो पाठवले. आता मी त्यांना विनंती करते की, त्यांनी त्या अधिकाऱ्यांची नावंदेखील सांगावी, ज्यांना मी फोटो पाठवले होते. या प्रकरणाबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, हे त्यांचं खासगी प्रकरण आहे.

हे ही वाचा >> “मी गोमांस खातो, ती आमची संस्कृती…”, मेघालय भाजपा अध्यक्षांकडून पक्षाला घरचा आहेर

आयपीएस डी. रुपा यांचे आरोप

रविवारी आयपीएस डी. रुपा यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर सिंधुरी यांचे ७ फोटो शेअर करत आरोप केला आहे की, सिंधुरी यांनी २०२१ आणि २०२२ मध्ये आयपीएस अधिकाऱ्यांना हे फोटो पाठवले होते. तीन पुरुष आयपीएस अधिकाऱ्यांना ऑल इंडिया सर्विस कंडक्ट रुल्सनुसार असे फोटो शेअर करणं आणि अशा प्रकारची बातचित करणं गुन्हा आहे. रुपा यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले की, त्यांनी सर्व बाजूंची चौकशी करावी.