कर्नाटकमधील सात महिन्याच्या बाळाला झाला दुर्मिळ आजार; जगात केवळ १४ जणांना या आजाराने ग्रासलंय

देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून या बाळाला मदत करता यावी म्हणून ऑनलाइन माध्यमातून एक मोहिम सुरु करण्यात आलीय.

baby
या बाळाला मदत करण्यासाठी लोकांनी पुढे यावं असं आवाहन त्याच्या पालकांनी केलंय. (प्रातिनिधिक फोटो सौजन्य रॉयटर्स)

बेंगळुरुमधील एका सात महिन्याच्या मुलाला बेन्टा नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. जगामध्ये केवळ १४ जणांना या आजाराने ग्रासल्याचं सांगितलं जात आहे. हा एक फारच दुर्मिळ आजार आहे. हा आजार प्रायमरी इम्युनोडिफिशिएन्सी डिसॉर्डर प्रकारात मोडतो. म्हणजेच जन्मानंतर रोगप्रतिकारशक्ती सक्षम नसण्यासंदर्भातील हा आजार आहे. विजेंयद्रा असं या बाळाचा नाव असून केवळ ब्लड स्टेम सेल ट्रान्सपान्टेशनच्या मदतीने त्याचा जीव वाचवता येणार आहे. बेंगळुरुमधील ब्लड स्टेम सेल नोंदणी करणाऱ्या एका संस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. ही संस्था आता या बाळाचा जीव वाचवण्यासाठी ब्लड स्टेम सेल डोनरचा शोध घेत आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार विजेंयद्राची आई रेखा यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. “एक आई म्हणून स्वत:च्या पोटच्या गोळ्याला या अवस्थेत पाहून फार वेदना होतात. त्याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही ब्लड स्टेम सेल डोनरचा शोध घेत आहोत,” असं रेखा सांगतात. स्टेम लेस डोनेट करण्यासाठी केवळ पाच मिनिटांचा वेळ लागलो. तुम्ही लॉगइन करुन ऑनलाइन स्वॅब सॅम्पल सबमिट करुन यासाठी अर्ज करु शकता. लोकांनी मदत केली आणि वेळेत स्टेम सेल डोनर सापडला तर माझ्या मुलाला या संकाटामधून वाचवण्यास तुमचाही हातभार लागेल असं आवाहन रेखा यांनी केलंय.

बालरोगतज्ज्ञ डॉ. स्टॅलिन रामप्रकाश यांनी विजेंयद्राला झालेल्या आजाराबद्दल सांगताना, बेंटा हा आजार जगातील १४ जणांना झालाय, अशी माहिती दिली. वय आणि आजाराचे गांभीर्य या दोन्ही मुद्द्यांचा विचार केल्यास विजेंयद्राला झालेल्या या आजाराबद्दलची माहिती जगातील इतर प्रकरणांपेक्षा फार लवकर लक्षात आल्याचंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. यापूर्वी या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींवर करण्यात आलेल्या उपायांचा विचार केल्यास आमच्या मते विजेंयद्राचा जीव वाचवण्यासाठी ब्लड स्टेम सेलचा वापर करता येईल. यासाठी आम्ही सध्या विजेंयद्राच्या स्टेम सेलशी जुळणारा स्टेम सेल असणाऱ्या दात्याच्या शोधात आहोत, अशी माहिती डॉक्टर रामप्रकाश यांनी दिली.

ब्लड स्टेम सेल डोनेट करण्यासाठी डीकेएमएस-बीएएमएसटी फाउंडेशनने ऑनलाइन ड्राइव्ह सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील कोणत्याही भागातील व्यक्ती आपला स्वॅब देऊन विजेंयद्राच्या स्टेम सेलशी आपला स्टेम सेल जुळतोय का हे पाहून मदत करु शकते. अधिक माहितीसाठी https://www.dkms-bmst.org/get-involved/virtual-drives/vijayendra या लिंकला भेट देता येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karnataka infant among 14 in world with rare genetic disorder benta scsg

Next Story
प्रशांत किशोर म्हणतात, “२०२४ मध्ये भाजपाला पराभूत करणं शक्य पण त्यासाठी…”
ताज्या बातम्या