कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी दिलीय. त्याने समाजमाध्यमांवर हातात तलवार घेऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार अशी धमकी त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून दिलीय. हा व्हिडीओ समाजमाध्यावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वेगवेगळ्या कलमांअतर्गत गुन्हा दाखल

पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ५०५ (१) (ब), २५ (१) (ब) तसेच शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

sharad pawar
“…तर मोदींना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही”, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा अहवाल मांडत शरद पवारांची टीका
BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
narendra modi majority in lok sabha polls BJP agenda after 2024
काशी-मथुरा, समान नागरी कायदा आणि मतदार संघांची पुनर्रचना; नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास काय निर्णय घेऊ शकतात?
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला

आरोपी फरार, पोलिसांचा शोध चालू

आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन भाजपाने आपली तायरी चालू केलीय. भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केलीय. असे असताना मोहम्मद नावाच्या या व्यक्तीने केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास मी मोदींना जीवे मारणार, अशी धमकी दिलीय. या थेट धमकीच्या व्हिडीओमुळे सध्या एकच खळबळ उडालीय. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मोहम्मद हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.