पंतप्रधानांची ‘ही’ गोष्ट ऐकून मास्क घालणं नाकारलं; मंत्र्यांनीच करोना प्रतिबंधाचे नियम बसवले धाब्यावर

याआधी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी करोनाची चाचणी करून घेण्यास नकार दिला होता.

करोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन न करणं हे आता कर्नाटकच्या नेत्यांना सवयीचं झालेलं दिसत आहे. कर्नाटकचे मंत्री उमेश कुट्टी यांनी मास्क घालण्याला केलेला विरोध याचं जिवंत उदाहरण आहे. मास्क का घातला नाही, याबद्दल विचारलं असता त्यांनी थेट पंतप्रधानांवर ढकललं. मास्क घालणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आहे, असं कारण कुट्टी यांनी दिलं.

भाजपा नेते आणि कर्नाटकाचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कुट्टी यांनी मास्क घालण्यास नकार दिला आहे. त्यांना या मागचं कारण विचारलं असता ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की मास्क घालण्याची सक्ती नाही. मास्क घालायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मला वाटत नाही मास्क घालावासा..म्हणून मी घालत नाही.

याआधी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी करोनाची चाचणी करून घेण्यास नकार दिला होता. ते म्हणाले होते की, जर आरोग्यमंत्र्यांना वाटत आहे, तर त्यांनी जाऊन स्वतःची चाचणी करून यावं. तुम्हाला काय वाटतं? मी काय कुठून बाहेरून आलोय का? मला कायदे माहित आहेत. तुम्ही वाटल्यास माझ्यावर गुन्हा दाखल करू शकता, पण मी चाचणी करणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karnataka minister refuses to wear mask violates covid norm vsk

Next Story
हॅट्स ऑफ नादिया..! तालिबान्यांमुळं देश सोडला, ११ भाषा शिकल्या, २०० गोल केले आणि आता बनली डॉक्टर!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी