कर्नाटकातील चिक्कबल्लापुर जिल्ह्यात भारतीय नागरिकत्वाशी संबंधित एक वेगळंच प्रकरण समोर आले आहे. भारतीय नागरिकाशी लग्न केलेल्या पाकिस्तानी महिलेने आणि तिच्या पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या मुलाने आपले नागरिकाला लपवून रेशन कार्ड आणि वोटर कार्ड बनवल्याचा आरोप असून दोघांना अटक करण्यात अली आहे.
संयुक्त अरब अमीरातमध्ये झाले लग्न
महिलेचे पती मोहम्मद अयुब खान हे संयुक्त अरब अमीरातमध्ये अयूब खान सध्या आखाती देशात बस चालक म्हणून काम करत आहेत. तेथे त्यांचा पाकिस्तानची नागरिक फराह नाझ हिच्याशी विवाह झाला. यांना एकूण चार मुले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी फरहा नाझ आणि तिचा मुलगा मोहम्मद फरदीन खान हे व्हिसाची मुदत संपल्यानंतरही चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील बागेपल्ली राहत होते. महिलेचे पती मोहम्मद अयुब खान हे बागेपल्ली येथील भारतीय नागरिक आहेत. त्यांची चारपैकी तीन मुले भारतीय नागरिक आहेत. त्यांचा मुलगा मोहम्मद फर्दिन याचा जन्म पाकिस्तानमध्ये झाल्याने तो पाकिस्तानी नागरिक आहे. सध्या हे कुटुंब कर्नाटक येथील बागेपल्ली येथे स्थायिक आहेत. पोलिसांनी सांगितले की व्हिसाची मुदत संपली असूनही फरहा नाझ आणि मोहम्मद फरदीन खान पाकिस्तानात परतले नव्हते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे
पोलिसांची चौकशी
पोलिसांना तपासादरम्यान असे आढळून आले की भारतीय नागरिक नसतानाही फराह नाझ तिचा मोठा मुलगा फर्दीन यांनी आपले पाकिस्तानी नागरिकत्व लपवून रेशन कार्ड आणि वोटर कार्ड आणि अनेक भारतीय ओळखपत्रे मिळवल्याची माहिती मिळाली होती. तसेच बँक खातीही उघडली होती. त्यानंतर चौकशी करण्यात आली. पोलीस या कागदपत्रांची सत्यता पडताळत आहेत आणि ती कशी काढण्यात आली होती याची तपासणी करत आहेत.
रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र रद्द
तपासानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकत्वाबाबत महत्त्वाची माहिती लपवून रेशन कार्ड मिळवण्यात आल्याचे सांगितल्याने ते रद्द केले. तसेच व्होटर आयडी कार्डही रद्द केले.
२०२५ मधील पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांबाबत केंद्र सरकारच्या नियमांमुळे त्यांचे व्हिसा नवीन करण्यात आले नाही का, याचाही पोलीस तपास करत आहेत. प्रथम माहिती अहवालानुसार ९ जुलै २०२६ च्या रात्री पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
फराह नाझ आणि फर्दिन या दोघांवर भारतीय न्याय संहिता परदेशी कायदा आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे चिक्कबल्लापुरचे पोलीस अधीक्षक कुशल चौकसे यांनी सांगितले आहे.
