Premium

कर्नाटकमध्ये संघ परिवाराला दिलेल्या भूखंडांचा फेरआढावा; आरोग्यमंत्री गुंडु राव यांचा दावा 

पत्रकार परिषदेत राव म्हणाले की, ‘संघ आणि संघ परिवारातील संस्थांना शेकडो एकर सरकारी जमीन देण्यात आली आहे.

karnataka to review land allocated to rss says karnataka minister dinesh gundu rao
आरोग्यमंत्री गुंडु राव

बंगळूरु : कर्नाटकातील आधीच्या भाजप सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या संबंधित संस्थांना शेकडो एकर जमीन दिली होती. त्याचा आम्ही फेरआढावा घेऊ, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री दिनेश गुंडु राव यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच भाजप सरकारने जारी केलेल्या काही निविदा रद्द करण्यात आल्या असून अन्य काही निविदांची तपासणी केली जात आहे, असेही राव यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राव म्हणाले की, ‘संघ आणि संघ परिवारातील संस्थांना शेकडो एकर सरकारी जमीन देण्यात आली आहे. या संस्थांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा प्रसार व्हावा या उद्देशाने ही जमीन देण्यात आली होती. हे होता कामा नये. जनतेला याबद्दल सगळी माहिती मिळाली पाहिजे. काहीही गोपनीय ठेवता कामा नये. सर्व काही एका संस्थेला देऊन टाकणे योग्य नाही. त्यामुळे आम्हाला ही पावले उचलावी लागत आहेत.’ ते म्हणाले की, ‘हे सरकारी पातळीवर करावे लागेल. महसूल खाते आणि मुख्यमंत्र्यांना काय आणि कसे घडले त्यामध्ये लक्ष घालावे लागेल. जमिनीचे वाटप कायद्यानुसार झाले का याचा निर्णय घ्यावा लागेल, तसेच त्यासाठी किती दर आकारण्यात आला हेही तपासावे लागेल.’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karnataka to review land allocated to rss says karnataka minister dinesh gundu rao zws

Next Story
लैंगिक छळप्रकरणी तपासाला वेग; ब्रिजभूषण सिंह यांच्या कार्यालयात पोलिसांकडून घटनाक्रमाची पडताळणी