scorecardresearch

कर्नाटकातील लिंगायत मठाचे प्रमुख शिवमूर्ती पोलिसांच्या ताब्यात; अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

मठप्रमुखांसह आणखी चार जणांवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटकातील लिंगायत मठाचे प्रमुख शिवमूर्ती पोलिसांच्या ताब्यात; अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील लिंगायत मठाचे प्रमुख शिवामूर्ती मुरुघा शरनारू

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील लिंगायत मठाचे प्रमुख संत शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संत शिवमूर्ती यांच्यावर मठ संचलित संस्थेतील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मठातील दोन अल्पवयीन मुलांनी दिलेल्या तक्रारीनंतर म्हैसूर शहर पोलिसांनी शिवमूर्ती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- १८ वर्षीय मुलीचं ५५ वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्न; लव्ह मॅरेजनंतर म्हणाले, “बॉबी देओलच्या ‘या’ गाण्यामुळे पडलो एकमेकांच्या प्रेमात”

मुलींचे साडेतीन वर्षांपासून लैंगिक शोषण

मठामार्फत चालवल्या जाणार्‍या शाळेत शिकणार्‍या दोन मुलींनी म्हैसूरमधील ओदानदी सेवा संस्थान या एनजीओशी संपर्क साधला होता. मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार मुरुघा मठ अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या १५ आणि १६ वर्षांच्या मुलींचे साडेतीन वर्षांपासून लैंगिक शोषण करण्यात येत होते. केवळ दोन मुलींवर नाही तर मठप्रमुख संस्थेत शिकणाऱ्या इतर अनेक विद्यार्थिनींना त्रास देत असल्याचा आरोप ओदानदी सेवा संस्था या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख स्टेनली यांनी केला आहे. मात्र, भीतपोटी मुलांनी ही बाब उघड केली नाही. आम्ही कोणत्याही दबावापुढे किंवा धमकीपुढे झुकणार नाही. पीडित मुलींना पूर्णपणे न्याय देणार असल्याचे स्टेनली म्हणाल्या. एनजीओने जिल्हा बालकल्याण समितीला याबाबत माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा- “डान्स करत राहा!” फिनलँडच्या पंतप्रधानांच्या ‘त्या’ कृतीला हिलरी क्लिंटन यांचं समर्थन

या प्रकरणाबाबत कर्नाटक सरकारचे म्हणणे काय?

पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करत आहेत. तपासानंतर सत्य लवकच बाहेर येईल असे मत कर्नाटकचे मुख्यंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून त्याबाबत भाष्य करणं योग्य नाही. चित्रदुर्गातील मुरुगा मठ राज्यात प्रसिद्ध आहे. ही घटना घृणास्पद आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्याअगोदर अंदाज बांधणे चूकीचे असल्याचे मत बीजेपी नेते ईश्वरअप्पा म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या