scorecardresearch

Premium

करणी सेनेच्या प्रमुखाची हत्या: दोन हल्लेखोरांसह अन्य एकाला घेतलं ताब्यात, मध्यरात्री केली कारवाई

करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन हल्लेखोरांसह त्यांच्या एका साथीदाराला ताब्यात घेतलं आहे.

Karni Sena chief Sukhdev Singh Gogamedi murder
फोटो-एएनआय

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन हल्लेखोरांसह त्यांच्या एका साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. रविवारी मध्यरात्री दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चंदीगडमधून या तिघांना ताब्यात घेतलं.

सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या रोहित राठोड आणि नितीन फौजी यांच्यासह उद्धम नावाच्या तिसऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिसऱ्या आरोपीची गोगामेडी यांच्या हत्येत नेमकी भूमिका काय आहे? याचा शोध पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे.

attack on friend of accused in Gulabe massacre in Pachpavali nagpur
उपराजधानीत टोळीयुद्धाचा भडका! पाचपावलीतील गुलाबे हत्याकांडातील आरोपींच्या मित्रावर जीवघेणा हल्ला
sarwan singh pandher
‘आम्ही पाकिस्तानमधून नाही आलो’, पोलीस दलाच्या कारवाईनंतर शेतकरी नेत्याचे विधान
Nikhil Wagle
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा विविध स्तरांतून निषेध
Devendra Fadnavis Abhishek Ghosalkar
“फडणवीस फोडाफोडीच्या राजकारणात…”, घोसाळकर हत्या प्रकरणानंतर अंजली दमानियांचा हल्लाबोल, सरवणकर-राणेंचा उल्लेख करत म्हणाल्या…

दिल्ली पोलिसांनी आरोपी रोहित आणि उद्धमला दिल्लीत आणलं आहे. तर आरोपी नितीन फौजी हा राजस्थान पोलिसांच्या ताब्यात आहे. संबंधित आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी पाच लाखांचं रोख बक्षीस जाहीर केलं होतं. पण रविवारी मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तिघांनाही ताब्यात घेतलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोगामेडी यांच्या हत्येनंतर आरोपींनी शस्त्रे लपवून ठेवली आणि राजस्थानमधून हरियाणातील हिसारला पलायन केलं. त्यानंतर सर्व आरोपी हिमाचल प्रदेशातील मनाली येथे गेले. तिथे काही दिवस राहिल्यानंतर सर्व आरोपी चंदीगडला परतले, जिथे सर्वांना अटक करण्यात आली. आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karni sena chief sukhdev singh gogamedi murder three accussed arrested at midnight from chandigrah rmm

First published on: 10-12-2023 at 08:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×