पीटीआय, श्रीनगर : काश्मीर खोरे आणखी गारठले आहे. श्रीनगरमध्ये रविवारी रात्री पारा उणे ३.४ अंश सेल्सियसपर्यंत घसरला. आतापर्यंत हंगामातील ही सर्वात थंड रात्र ठरली. काश्मीरमध्ये इतरत्रही पारा गोठणबिंदूच्या खाली गेला असल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

रविवारी रात्री श्रीनगरमधील किमान तापमान या हंगामातील सामान्य तापमानापेक्षा २.५ अंशांनी कमी होते. गोठणबिंदूखालील तापमानासाठी प्रसिद्ध उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गच्या प्रसिद्ध ‘स्की रिसॉर्ट’पेक्षाही श्रीनगरमधील तापमान कमी होते. गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे ३.२ अंश नोंदवले गेले. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम पर्यटक ‘रिसॉर्ट’मध्ये उणे ४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. काश्मीर खोऱ्याचे प्रवेशद्वाराचे शहर काझीगुंड येथे किमान तापमान उणे ३.४ अंश होते. दक्षिणेकडील कोकरनाग शहरातही किमान तापमान उणे १.४ अंश होते. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे उणे २.७ अंश तापमानाची नोंद झाली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

हवामान विभागाच्या कार्यालयाने सांगितले, की हवामान कोरडे राहण्याची शक्यता असली तरी ८ डिसेंबपर्यंत धुके कायम राहणार आहे. ९ डिसेंबरपासून जम्मू-काश्मीर आणि लगतच्या भागांवर पश्चिमेत नव्याने निर्माण झालेल्या विक्षोभाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर, मैदानी व सखल भागात हलकी हिमवृष्टी व मध्यम व उंच भागात हलकी हिमवृष्टी होईल. दोन दिवस या भागात हलक्या ते मध्यम हिमवृष्टीची शक्यता आहे.