scorecardresearch

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग, काश्मिरी पंडित भावांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात काश्मिरी पंडिताचा मृत्यू

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग, काश्मिरी पंडित भावांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात काश्मिरी पंडिताचा मृत्यू (File Photo)

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात काश्मिरी पंडिताचा मृत्यू झाला आहे. शोपियन येथे सफरचंदाच्या बागेत दहशतवाद्यांकडून दोन भावांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका भावाचा मृत्यू झाला, तर एक जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून स्थलांतरितांना लक्ष्य केलं जात असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

जम्मू काश्मीरमध्ये बिहारच्या कामगाराची गोळ्या घालून हत्या

काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, “शोपियन येथे दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या बागेत स्थानिकांवर गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, एक जखमी आहे. दोघेही अल्पसंख्यांक समाजातील आहेत. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परिसर सील करण्यात आला आहे”.

दरम्यान, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. सुनील कुमार असं त्यांचं नाव असून, पिंटू कुमार जखमी आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kashmiri pandit shot by terrorists in srinagar jammu kashmir sgy