पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बॅरकपूर मतदारसंघातून चित्रपट निर्माते आणि टीएमसीचे उमेदवार राज चक्रवर्ती यांचा पराभव केल्यामुळे तसेच तीन वर्षे पाळलेली राजकीय शपथ मोडल्यामुळे नवनिर्वाचित भाजप आमदार कौस्तव बागची पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बॅरकपूरचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बागची यांनी जाहीर केले की, ते आता आपले केस पुन्हा वाढवणार आहेत.

“आता मी माझे केस पुन्हा वाढवू शकेन”

निवडणुकीतील विजयानंतर बोलताना बागची म्हणाले, “आता मी माझे केस पुन्हा वाढवू शकेन. मी शपथ घेतली होती की जोपर्यंत टीएमसीचा पराभव होऊन भाजप सत्तेवर येत नाही, तोपर्यंत मी डोके मुंडवून ठेवीन. त्यासाठी मला अपमान, टीका आणि प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी माझी व्यंगचित्रे काढली, पण मी प्रत्येक वेळी त्यांचे कौतुक केले; कारण मी प्रतिभेचा आदर करतो आणि प्रतिभावान लोकांना प्रोत्साहन द्यायला मला आवडते.”

ते पुढे म्हणाले, “माझ्या कुटुंबाने किंवा मी या गोष्टींकडे कधीही नकारात्मकतेने पाहिले नाही. लोक माझी थट्टा करत होते, पण मी हे कशासाठी करत आहे, याची आम्हाला जाणीव होती.”

का घेतली होती ‘ती’ शपथ?

२०२३ मध्ये, तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेचा कौस्तव बागची यांनी निषेध केला होता. यानंतर कोलकाता पोलिसांनी त्यांना अटक केली होती. जामीन मिळाल्यानंतर बागची यांनी आपले मुंडण केले आणि शपथ घेतली की, “जोपर्यंत राज्यातून तृणमूल काँग्रेसचे सरकार जात नाही, तोपर्यंत मी डोक्यावर केस ठेवणार नाही.”

सुरुवातीला केवळ एक प्रतिकात्मक निषेध म्हणून सुरू झालेली ही गोष्ट हळूहळू त्यांची सार्वजनिक ओळख बनली. २०२६ च्या निवडणूक प्रचारात त्यांचा हा ‘बाल्ड लूक’ (टक्कल) चर्चेचा विषय ठरला होता.

निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बागची काय म्हणाले होते?

“आता मी माझे केस वाढवू शकतो. जोपर्यंत टीएमसीचा पराभव होत नाही आणि भाजप सत्तेत येत नाही, तोपर्यंत डोके मुंडण करून ठेवण्याची मी शपथ घेतली होती. त्यासाठी मला अपमान, टीका आणि प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी माझी व्यंगचित्रे काढली, पण मी नेहमीच त्यांचे कौतुक केले कारण मी कलेचा आदर करतो.”

ते पुढे म्हणाले, “माझ्या कुटुंबाने किंवा मी या गोष्टींकडे कधीही नकारात्मकतेने पाहिले नाही. लोक माझी थट्टा करत होते, पण मी हे कशासाठी करत आहे, याची आम्हाला जाणीव होती.” बागची यांनी २०२४ मध्ये काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पेश्याने वकील असलेल्या बागची यांना सहावीत असल्यापासूनच राजकारणाची ओढ होती. त्यांच्या मते, हा विजय म्हणजे बॅरकपूरच्या जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेला आशीर्वाद आहे.