केजरीवालांच्या ‘फुलजडीत’ रुपाची ‘फूलमंत्री’ म्हणून सोशल मीडियावर खिल्ली!

केजरीवाल त्यांच्यावरील विनोदासाठी ट्विटरकरांना नवेनवे बहाणे देताना दिसतात.

(Source: Twitter)

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्यावरील विनोदासाठी ट्विटरकरांना नवेनवे बहाणे देताना दिसतात. केजरीवाल यांनी गोवा दौऱ्यादरम्यान डोक्यावर फुलांची माळ घातली. त्याच्या या रुपाने ट्विटरवर चर्चेला उधाण आले. केजरीवाल यांना हा कोणता नाद जडला आहे, असा प्रश्न काही युजर्सनी विचारला, तर केजरीवाल आपल्या शॅम्पूमध्ये जास्त खताचा वापर करत असल्याचे देखील म्हणण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेल्या काही दिवसांमध्ये ट्विटरवर सर्वात जास्त ट्रोल होणारे व्यक्ती ठरले. केजरीवालांच्या या ‘फुलजडीत’ रुपावर कशाप्रकारच्या कमेन्ट आल्या ते येथे पाहाता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kejriwal trolled over his special headgarland