गुवाहाटी, तिरुवअनंतपुरम : केरळ, आसाम तसेच पुदुच्चेरी विधानसभेसाठी दि. ९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या तीनही ठिकाणी विधानसभेसाठी एकूण २९६ जागा असून, एकाच टप्प्यात हे मतदान होईल. केरळमध्ये सत्तारूढ डावी लोकशाही आघाडी विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त लोकशाही आघाडी असा सामना आहे. राज्यात विधानसभेच्या १४० जागा असून, भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनेही सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. केरळमध्ये गेली दहा वर्षे डाव्या आघाडीचे सरकार आहे.
केरळमध्ये दोन कोटी ७१ लाख मतदार ८८३ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील. आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागा असून, भाजप हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात आहे. येथे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही विरुद्ध काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील आघाडी असा सामना आहे. एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांचा पक्ष ३० जागा लढवत आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांत ३१ हजार ४९० मतदान केंद्रे असून ७२२ उमेदवार रिंगणात आहेत. केंद्र शासित प्रदेश पुदुच्चेरीत ३० जागांसाठी गुरुवारीच मतदान होत आहे. येथे एआयएनआरसीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात इंडिया आघाडीतून काँग्रेस सर्वाधिक १६ जागा लढवत आहेत. या आघाडीत द्रमुकचाही समावेश आहे. एकूण २९४ उमेदवार रिंगणात आहेत.
अजमल यांचा पक्ष ३० जागा लढवत आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांत ३१ हजार ४९० मतदान केंद्रे असून ७२२ उमेदवार रिंगणात आहेत. केंद्र शासित प्रदेश पुदुच्चेरीत ३० जागांसाठी गुरुवारीच मतदान होत आहे. येथे एआयएनआरसीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात इंडिया आघाडीतून काँग्रेस सर्वाधिक १६ जागा लढवत आहेत. या आघाडीत द्रमुकचाही समावेश आहे. एकूण २९४ उमेदवार रिंगणात आहेत.
पोंडा पोटनिवडणुकीची अधिसूचना रद्द
पणजी : गोव्याच्या पोंडा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची अधिसूचना रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. ही निवडणूक ९ एप्रिलला होणार होती. या मतदारसंघाचा एका वर्षापेक्षा कालावधी शिल्लक राहिलेला असताना पोटनिवडणूक घेतली जात आहे, यावर आक्षेप घेत दोन मतदारांनी अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान दिले होते. त्यावर न्या. वाल्मिकी मेनेझेस आणि न्या. अमित जामसंडेकर यांनी बुधवारी निकाल दिला.
