Kerala Assembly Election Exit Poll Results Party Wise Trends: केरळमध्ये १४० विधानसभेच्या जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. राज्यात यावेळी ६२.७१ टक्के मतदान झाले. इथं एलडीएफ, काँग्रेसप्रणित यूडीएफ आणि भाजपा यांच्यात लढत होत आहे. समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफ सरकार स्थापन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काँग्रेसप्रणित यूडीएफला केरळमध्ये ७० ते ८५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर, एलडीएफला ५५ ते ६५ जागा मिळतील असे एक्झिट पोलमधून शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. १४० जागांच्या या राज्यात बहुमतासाठी ७१ जागांची आवश्यकता आहे.

पिपल्स पल्स

एलडीएफ – ५५ ते ६५ जागा
काँग्रेसप्रणित यूडीएफ – ७५ ते ८५ जागा
एनडीए – ० ते ३ जागा
इतर – शून्य

मॅट्रिझनुसार

एलडीएफ – ६० ते ६५ जागा
काँग्रेसप्रणित यूडीएफ – ७० ते ७५ जागा
एनडीए – ३ ते ५ जागा
इतर – २ ते ४ जागा

एक्सिस माय इंडिया

एलडीएफ – ४९ ते ६२ जागा
काँग्रेसप्रणित यूडीएफ – ७८ ते ९० जागा
एनडीए – ० ते ३ जागा
इतर – शून्य

पी- मार्क

एलडीएफ – ६० ते ६५ जागा
काँग्रेसप्रणित यूडीएफ – ७० ते ७५ जागा
एनडीए – ३ ते ५ जागा
इतर – शून्य

जेव्हीसी

एलडीएफ – ५२ ते ६१ जागा
काँग्रेसप्रणित यूडीएफ – ७२ ते ८४ जागा
एनडीए – ३ ते ७ जागा
इतर – शून्य

केरळमध्ये ९ एप्रिल रोजी १४० जागांसाठी मतदान झाले. डाव्यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए या आघाडीच्या लढतीत मतदानाची टक्केवारी सुमारे ७८.२७ टक्के होती. सत्ताधारी एलडीएफ सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवू शकेल की यूडीएफ किंवा भाजपच्या नेतृत्वाखालील गट हा क्रम मोडेल, हे अंतिक निकाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल.