scorecardresearch

गुन्हा हा गुन्हाच, त्यात ‘माध्यमस्वातंत्र्य’ आणू नका; केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे प्रतिपादन

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी एशियानेट न्यूजवरील पोलीस कारवाईचे समर्थन केले असून त्यात प्रेस स्वातंत्र्याचा मुद्दा आणता येणार नाही, अशी भूमिका केरळ विधानसभेत मांडली.

गुन्हा हा गुन्हाच, त्यात ‘माध्यमस्वातंत्र्य’ आणू नका; केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे प्रतिपादन

एक्सप्रेस वृत्त
तिरुवनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी एशियानेट न्यूजवरील पोलीस कारवाईचे समर्थन केले असून त्यात प्रेस स्वातंत्र्याचा मुद्दा आणता येणार नाही, अशी भूमिका केरळ विधानसभेत मांडली.गुन्हेगारी कृतीत गुंतलेल्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करताना एखाद्य व्यक्तीचा व्यवसाय हा घटक नसतो. कायदा तशी परवानगी देत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस आमदार पी. सी. विष्णुनाथ यांनी स्थगिती प्रस्ताव मांडला होता. त्यावर मुख्यमंत्री बोलत होते. सभापती ए. एन. शमसीर यांनी स्थगन प्रस्तावाला परवानगी नाकारल्याने विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला.

पिनराई सरकार एशियानेट विरुद्धच्या कारवाईवर ठाम असताना, या प्रकरणावर सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीतही मतभेद असल्याचे दिसते. एशियानेटवरील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सीपीआयचे सहाय्यक सचिव प्रकाश बाबू म्हणाले, हे प्रेस स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्याला धक्का देणारी कोणतीही कृती किंवा प्रकरण टाळले पाहिजे, असे ते म्हणाले. हे मुख्यमंत्री यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करून बाबू म्हणाले की ते पक्ष समितीमध्ये हा मुद्दा उपस्थित करतील. या मुद्दय़ावर काय भूमिका घेणार हे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर अवलंबून आहे.
एशियानेट न्यूजच्या तीन पत्रकारांना पोस्को खटल्याचा सामना करावा लागत आहे. सीपीआय(एम) समर्थित आमदार पी. व्ही. अन्वर यांच्या तRारीनंतर पोलिसांनी रविवारी कथित बनावट बातम्यांवरून कोझिकोड येथील प्रादेशिक कार्यालयावर धाड टाकली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 02:01 IST