केरळमधील पहिली तृतीयपंथी रेडिओ जॉकी म्हणून ओळख मिळवलेल्या अनन्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. अनन्याने विधानसभा निवडणूकदेखील लढली होती. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारीदेखील ती पहिलीच तृतीयपंथी उमेदवार होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेडरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत अनन्याचा मृतदेह आढळून आला.

याआधी २८ वर्षीय अनन्याने लिंगबदल शस्रक्रियेनंतर आपली प्रकृती ठीक नसल्याची माहिती दिली होती. सर्जरीनंतर आपण बराच वेळ एका ठिकाणी उभं राहू शकत नाही तसंच काम करु शकत नसल्याचं तिने म्हटलं होतं. सर्जरीमध्ये झालेल्या काही चुकांमुळे आपल्याला आरोग्याशी संबंधित अडचणी जाणवत असल्याची माहिती तिने दिली होती.

Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
Chief Minister Shinde Deputy Chief Minister Pawar instructions to the office bearers of the Grand Alliance not to make controversial statements offensive actions Pune news
वादग्रस्त विधाने, आक्षेपार्ह कृती नको! मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
Ask the Election Commission of the Supreme Court about all the voting receipts in VVPAT
व्हीव्हीपॅटमधील सर्वच मतदान पावत्यांची पडताळणी शक्य आहे काय? सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला विचारणा
Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यासंबंधी तक्रारींमुळे मृत्यू झाल्याची शंका आहे. सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे. दरम्यान अनन्याच्या मित्रांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे.

अनन्या कुमारी अॅलेक्स विधानसभा निवडणूक लढवणारी पहिली तृतीयपंथी होती. मात्र नंतर तिने डीएसजेपी पक्षाकडून मानसिक त्रास दिला जात असून हत्येच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत उमेदवारी मागे घेतली होती. अनन्या रेडिओ जॉकीसोबतच मेकअप आर्टिस्ट आणि एका खासगी न्यूज चॅनेलमध्ये अँकरही होती.