scorecardresearch

Premium

कुलगुरू पुनर्नियुक्तीचा केरळ राज्यपालांचा निर्णय रद्द; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही फटकारले

कन्नूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी गोपीनाथ रिवद्रन यांची पुनर्नियुक्ती करण्याचा केरळ सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला.

Kerala Governor decision to reappoint Vice Chancellor overruled The Supreme Court also reprimanded the state government
कुलगुरू पुनर्नियुक्तीचा केरळ राज्यपालांचा निर्णय रद्द; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही फटकारले( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली

कन्नूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी गोपीनाथ रविंद्रन यांची पुनर्नियुक्ती करण्याचा केरळ सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. तसेच या प्रकरणातील ‘अनावश्यक हस्तक्षेपा’बद्दल मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या सरकारलाही न्यायालयाने  फटकारले.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचा रविंद्रन यांच्या पुनर्नियुक्तीचा आदेश सदोष असल्याचे निदर्शनास आणले. राज्यपाल खान यांनी कुलगुरूंची पुनर्नियुक्ती करण्याबाबतच्या आपल्या वैधानिक अधिकारांना तिलांजली दिल्याची टिप्पणीही खंडपीठाने केली. राज्यपाल हे राज्यातील सर्व विद्यापीठांचे पदसिद्ध कुलपतीही असतात.राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवण्याचा केरळ उच्च न्यायालयाच्या एकल पीठाचा आणि खंडपीठाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.

retired judge pension
निवृत्त न्यायाधीश २० हजारांत भरणपोषण कसे करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र शासनाला सवाल
supreme court
राज्य शासनाने ‘ईडी’ला साहाय्य करावे; सर्वोच्च न्यायालयाचा तमिळनाडू सरकारला सल्ला
supreme court
सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निवडणूक रोखे योजना’ रद्द, असंवैधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल!
supreme court slams gujarat police government for remand of accused who granted anticipatory bail
न्यायाधीश, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्या ! गुजरात उच्च न्यायालय, सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी

राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केरळचे राज्यपाल खान यांनी याचे खापर मुख्यमंत्री विजयन यांच्यावर फोडले. थिरुवनंतरपुरम येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की यात शिक्षणमंत्री आर. बिंदू यांना दोष देण्यात अर्थ नाही. रिवद्रन यांच्या पुनर्नियुक्तीसाठी मुख्यमंत्री पी. विजयन यांनी बिंदू यांचा वापर केला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kerala governor decision to reappoint vice chancellor overruled the supreme court also reprimanded the state government amy

First published on: 01-12-2023 at 03:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×