पत्नीची हत्या करण्यासाठी बँकेत घुसला पण मास्कमुळे गोंधळला; चाकूने वार केल्यानंतर चेहरा पाहिला तर….

पूर्वाश्रमीच्या पत्नीची हत्या करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने मास्कमुळे भलत्याच महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे

Murder, Crime,
पूर्वाश्रमीच्या पत्नीची हत्या करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने मास्कमुळे भलत्याच महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे

पूर्वाश्रमीच्या पत्नीची हत्या करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने मास्कमुळे भलत्याच महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने पत्नीऐवजी अनोळखी महिलेवर चाकूने वार केले. केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यात ही घटना घडली आहे. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

बिजू असं या आरोपी पतीचं नाव असून पत्नीची हत्या करण्यासाठी तो को-ऑपरेटिव्ह बँकेत घुसला होता. यावेळी त्याने एका भलत्याच महिलेला पत्नी समजून तिच्यावर चाकूने वार केले. ही महिला बँकेतील दुसरी कर्मचारी असल्याचं नंतर उघड झालं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजता ही घटना घडली असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीने ज्या महिलेवर हल्ला केली ती महिला त्याची पत्नी बसते त्या जागी बसली होती असंही त्यांनी सांगितलं. बिजू हा कोझिकोडेमधील रहिवासी असून दोन वर्षांपूर्वी पत्नीपासून वेगळा झाला होता. जखमी महिलेवर सध्या उपचार सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kerala man goes to kill ex wife stabs wrong woman amid confusion due to face mask sgy

ताज्या बातम्या