scorecardresearch

चाईल्ड पॉर्न पाहणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; बालकांच्या तस्करीची प्रकरणेही उघड

बालकांच्या लैंगिक शोषण प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांचे एकूण २८० गट ४४८ ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

केरळ पोलिसांनी चाईल्ड पॉर्न पाहणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. यातल्याच काही प्रकरणांमधून बालकांच्या तस्करीचे प्रकारही समोर आले आहेत. ३ एप्रिल रोजी रविवारी केरळमध्ये याच संदर्भातल्या ३९ गुन्हे आणि १४ अटक झाल्या आहेत. बालकांच्या लैंगिक शोषण प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांचे एकूण २८० गट ४४८ ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांच्या या गटांनी बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सोशल मीडिया आणि इंटरनेटवरील साहित्य तयार करणाऱ्या आणि पसवणाऱ्या लोकांवर कारवाई केली. अटक करण्यात आलेले बहुतांश लोक तरुण आणि तंत्रज्ञ आहेत. त्यांनी चाईल्ड पॉर्न कन्टेन्ट डाऊनलोड आणि अपलोड करण्यासाठी इनक्रिप्टेड खाती वापरली होती.

या छाप्यादरम्यान २६७ इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत, ज्यात मोबाईल फोन, मोडेम्स, हार्ड डिस्क्स, मेमरी कार्ड, लॅपटॉप्स आणि डेस्कटॉप्सचा समावेश आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृतानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, यापैकी काही जणांना बालकांच्या तस्करीत सहभागी असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अशा प्रकारचे पुरावे आढळून आले आहेत.

सायबरडोम नोडल अधिकारी, अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) मनोज अब्राहम यांनी सांगितले की, बेकायदेशीर प्रतिमा आणि व्हिडिओ प्रसारित करण्यात गुंतलेल्या लोकांचा तपशील गोळा केला जात आहे. काही प्रकरणांमध्ये, पेमेंटवर मुलांसोबत सत्रांचे दुवे उपलब्ध होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kerala police cracks down on child porn viewers identify links to rackets vsk

ताज्या बातम्या