Kerala, Tamil Nadu & Puducherry Assembly Election Results 2026 : भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा कोलाथूर मतदारसंघात पराभव झाला आहे. अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांचा विजय झाला आहे. व्ही. एस. बाबू यांनी ८२९९७ मते मिळवली. स्टॅलिन यांचा ८७०० मतांनी पराभव झाला आहे. प्रस्थापित डीएमके व एआयएडीएमके या पक्षांना विजय यांनी हादरा दिला आहे. विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असून एआयएडीएमके पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तमिळनाडूतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. तर दुसरीकडे केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात लढलेल्या माकप (सीपीआय – एम) प्रणित एलडीएफला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने केरळमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. देशात फक्त केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती. ती केरळमध्ये संपुष्टात आल्याचे दिसत आहे. पुद्दुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. परंतु, तरीही ते बहुमतापासून दूर आहेत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे (AINRC) अध्यक्ष व मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांची सत्ता आहे. ती कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. AINRC हा पक्ष भाजपा प्रणित एनडीएचा घटक आहे. तमिळनाडू, केरळ व पुद्दुचेरीतील निकाल या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
हातजोडून मानले मतदारांचे आभार, निकालानंतर थलपती विजय यांनी समर्थकांना दिले दर्शन
थलपती विजय तमिळनाडुच्या निवडणुकीत आश्चर्यकारक पद्धतीने यश संपादन करत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. विक्रमी आघाडीनंतर विजय यांनी पहिल्यांदाच समर्थनकांना दर्शन दिले.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन ७,००० हून अधिक मतांनी आघाडीवर
एकीकडे द्रमुक (DMK) प्रमुख आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना त्यांच्या हक्काच्या कोलाथूर मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला असताना, त्यांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या चेपॉक मतदारसंघातून महत्त्वाचा कल समोर येत आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, उदयनिधी स्टॅलिन यांनी ७,००० हून अधिक मतांची आघाडी घेतली असून टीव्हीकेचे (TVK) सेलवम सध्या पिछाडीवर आहेत.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का, एम.के. स्टॅलिन यांचा ८७०० मतांनी दारूण पराभव
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा कोलाथूर मतदारसंघात पराभव झाला आहे. अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांचा विजय झाला आहे. व्ही. एस. बाबू यांनी ८२९९७ मते मिळवली. स्टॅलिन यांचा ८७०० मतांनी पराभव झाला आहे.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का, एम.के. स्टॅलिन यांचा ८७०० मतांनी दारूण पराभव
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा कोलाथूर मतदारसंघात पराभव झाला आहे. अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांचा विजय झाला आहे. व्ही. एस. बाबू यांनी ८२९९७ मते मिळवली. स्टॅलिन यांचा ८७०० मतांनी पराभव झाला आहे.
Kerala Assembly Election Results 2026 Live Updates: राहुल गांधी काय म्हणाले?
Kerala Assembly Election Results 2026 Live Updates: खऱ्या अर्थाने निर्णायक कौल दिल्याबद्दल केरळमधील बंधु-भगिनींचे आभार; प्रचार तसेच चांगला लढा दिल्याबद्दल यूडीएफच्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन, मी आधीच म्हटल्याप्रमाणे केरळमध्ये क्षमता आहे, केरळमध्ये गुणवत्ता आहे. आता केरळमध्ये यूडीएफचे सरकार असेल. मी लवकरच माझ्या केरळम कुटुंबाच्या भेटीला येणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींनी मानले केरळवासियांचे आभार, काँग्रेस प्रणित यूडीएफने केला बहुमताचा आकडा पार
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे कोलाथूर मतदारसंघात पिछाडीवर आहेत.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: "काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विजय त्यांना सत्ता देण्यास तयार", विजय यांच्या वडिलांची प्रतिक्रिया
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: तमिळनाडूत थलपती विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विजय यांच्या वडीलांनी भावना व्यक्त केल्या. “काँग्रेसच्या स्वत:च्या परंपरा तसेच एक संस्कृती आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विजय त्यांना बळ देण्यास तयार आहे”, असे विजय यांचे वडील एसए चंद्रशेखर म्हणाले.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: टीव्हीके १८, डीएमके ८, एआयएडीएमके ३ जागांवर विजयी
Kerala Assembly Election Results 2026 LIVE: फातिमा थाहिलिया यांना IUML च्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान
केरळमधील इंडियन यूनियन मुस्लिम लीगने (IUML) इतिहास घडवला आहे. पेरंबरा मतदारसंघातून IUML ची पहिली महिला आमदार निवडून आली आहे. फातिमा थाहिलिया यांचा विजय झाला आहे. त्यांनी CPI - M चे विद्यमान आमदार टीपी रामाकृष्णन यांचा पराभव केला आहे.
Tamil Nadu Assembly Elections Result 2026 Live Updates: तामिळनाडूत एकूण जागा किती? बहुमतासाठी किती जागा आवश्यक? कोणत्या पक्षाची काय स्थिती?
Tamil Nadu Assembly Elections Result 2026 Live Updates: तमिळनाडूत विधानसभेच्या एकूण २३४ जागा आहेत. बहुमतासाठी ११८ जागांवर जिंकणे आवश्यक आहे. अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाला १०९ जागांवर आघाडी मिळाली आहे. विजय यांचा पक्ष बहुमताजवळ पोहोचत आला आहे. तर तमिळनाडूतील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुक (एआयएडीएमके – AIADMK) पक्ष ५२ जागांवर आघाडीवर आहे. तर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सत्ताधारी द्रमुक (डीएमके – DMK) पक्षाला ७२ जागांवर आघाडी मिळाली आहे. विजय यांचा तामिळनाडूच्या राजकारणात उदय झाला आहे.
Puducherry Election Results 2026 LIVE Updates: पुद्दुचेरीत विधानसभेच्या एकूण जागा किती? बहुमतासाठी किती जागा आवश्यक? कोणत्या पक्षाला किती जागांवर आघाडी मिळाली? सद्यस्थिती काय?
Puducherry Election Results 2026 LIVE Updates: पुद्दुचेरी या केंद्र शासित प्रदेशात विधानसभेच्या एकूण ३० जागा आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी १६ जागांची आवश्यकता आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएने तंतोतंत १६ जागा जिंकल्या होत्या व सत्ता स्थापन केली होती. पुद्दुचेरीत एनडीए विरूद्ध इंडिया आघाडी अशी लढत झाली. एनडीएने १८ जागांवर, तर इंडिया आघाडीने ७ जागांवर आघाडी घेतली आहे. इतर पक्षांनी ५ जागांवर आघाडी घेतली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एन. रंगास्वामी हे आघाडीवर आहेत.
Kerala Assembly Elections Result 2026 Live Updates: केरळमध्ये एकूण जागा किती? बहुमतासाठी किती जागा आवश्यक? कोणत्या पक्षाची काय स्थिती?
Kerala Assembly Elections Result 2026 Live Updates: केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागा असून बहुमतासाठी ७० जागा जिंकणे आवश्यक आहे. सत्ताधारी माकप प्रणित लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (एलडीएफ) व विरोधक काँग्रेस प्रणित यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ) या दोन आघाड्यांमध्ये मुख्य लढत झाली. देशात फक्त केरळमध्ये माकपची सत्ता होती. परंतु, या निवडणुकीत काँग्रेसने माकपला धक्का दिला आहे. केरळमध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफची सत्ता स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वातील एलडीएफला फक्त ३४ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर यूडीएफने बहुमताचा आकडा पार केला आहे. यूडीएफला ९१ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर इतर पक्षांना १५ जागांवर आघाडी मिळाली.
कारची नंबर प्लेट की मुख्यमंत्री होण्याचं भाकीत? थलपती विजयच्या 'त्या' गाडीचा फोटो होतोय व्हायरल!
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: पक्ष स्थापनेनंतर दोन वर्षांच्या अवधीतच सत्तेपर्यंत पोहोचणारे थलपती विजय दुसरे नेते
तमिळनाडूत अभिनेते विजय यांच्या पक्षाची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. विजय यांनी टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम पक्षाची स्थापना दोन वर्षांपूर्वी केली होती. दोन वर्षांतच सत्तेपर्यंत पोहोचणारे ते दुसरे नेते ठरले आहेत. या आधी एन. टी. रामा राव यांनी तेलुगु देसम पक्षाची स्थापना केल्यानंतर दोन वर्षांतच सत्तेपर्यंत पोहचण्याचा विक्रम रचला होता. त्यानंतर असे करणारे विजय हे दुसरे नेते ठरले आहेत. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांनी १९७२ मध्ये एआयएडीएमके पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांना १९७७ मध्ये सत्तेची सुत्रे हाती मिळाली.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: "काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विजय त्यांना सत्ता देण्यास तयार", विजय यांच्या वडिलांची प्रतिक्रिया
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: तमिळनाडूत थलपती विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विजय यांच्या वडीलांनी भावना व्यक्त केल्या. "काँग्रेसच्या स्वत:च्या परंपरा तसेच एक संस्कृती आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विजय त्यांना बळ देण्यास तयार आहे", असे विजय यांचे वडील एसए चंद्रशेखर म्हणाले.
Kerala Election Results 2026 Live Updates: केरळमध्ये भाजपाला तीन जागांवर यश, यूडीएफची सत्तेच्या दिशेने वाटचाल
Kerala Election Results 2026 Live Updates: केरळमध्ये भाजपाने तीन जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सीपीआय-एमचे विद्यमान आमदार कडकमपल्ली सुरेंद्रन यांचा पराभव केला आहे. कझाकुट्टम मतदारसंघातून ते निवडणूक लढवत होते. तर इतर दोन ठिकाणी भाजपा उमेदवारांनी डाव्या उमेदवारांचा पराभव केला आहे. केरळमध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफने एकूण १४० जागांपैकी १०२ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: "आज तो तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनत आहे", विजय यांच्या वडीलांची पहिली प्रतिक्रिया
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: तामिळनाडूच्या राजकारणात दाक्षिणात्य अभिनेते विजय यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. विजय यांचे वडील एसए चंद्रशेखर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. "मागील ३० वर्षांपासून समाजासाठी काहीतरी करायचंय, असा विचार विजय करत होता. त्याला तमिळ लोकांसाठी काहीतरी करायचं होतं. हळूहळू गोष्टी त्याप्रमाणे होत गेल्या. आज तो तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनत आहे. फक्त नेता म्हणून तमिळ लोकांनी त्याच्यावर प्रेम केले नाही, तर प्रत्येक महिलेला तो तिच्या मुलासारखा वाटतो. प्रत्येक तरूण मुलाला तो त्याचा भाऊ वाटतो. प्रत्येक जण त्याला अण्णा (भाऊ) म्हणून हाक मारतो. त्याने जनतेत आणि त्याच्यात तसं नातं तयार केलं आहे", असे विजय यांचे वडील एसए. चंद्रशेखर म्हणाले.
थलपती विजय यांनी त्यांच्या खासगी ड्रायव्हरच्या मुलाला दिले होते तिकिट
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: टीव्हीकेच्या पहिल्या विजयी उमेदवाराची घोषणा
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या पहिल्या विजयी उमेदवाराची घोषणा अधिकृतरित्या करण्यात आली आहे. विजयसर्वानण यांचा थंजावूर मतदारसंघातून १६९५५ मताधिक्क्याने विजय झाला आहे.
Tamil Nadu Election Results 2026 Live Updates: लोकसभा व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकारने १३१ व्या घटनादुरूस्तीचे विधेयक संसदेत मांडले होते. लोकसभेच्या जागा वाढवण्याचा भाजपा सरकारचा विचार होता. त्याला तमिळनाडूतील डीएमके पक्षाने कडाडून विरोध केला होता. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात डीएमकेने हा मुद्दा लावून धरला होता. मतदारसंघांची पुनर्रचना करून भाजपा त्यांच्या सोईने मतदारसंघांची पुनर्रचना करेल, अशी शंका डीएमके तसेच इतर विरोधी पक्षांनी व्यक्त केली होती. हा मुद्दा तामिळनाडूच्या राजकारणात चालला नसल्याचे दिसून येते.
Tamil Nadu Election Results 2026 Live Updates: केरळ हा देशातील माकपचा शेवटचा गड होता. परंतु, तोही ढासळल्याचे चिन्ह दिसत आहे. केरळमध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफला सत्ता मिळताना दिसत आहे. तर सत्ताधारी एलडीएफ बहुमतापासून अद्याप दूर आहे. एकेकाळी पश्चिम बंगाल व त्रिपुरात माकपची सत्ता होती. ती संपुष्टात आली. आता केरळमध्ये देखील माकपची सत्ता संपुष्टात आली आहे. माकपला शेवटचे राज्य देखील गमवावे लागले आहे.
Tamil Nadu Election Results 2026 Live Updates: तमिळनाडूतील सत्ताधारी पक्ष असलेल्या डीएमकेने भाजपावर मागील काही महिन्यांत जोरदार टीका केली होती. डीएमके पक्षाला तमिळनाडूत मोठा झटका बसला आहे. अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेले थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडूत मुसंडी मारली आहे. त्यांचा पक्ष तमिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. एम.जी. रामचंद्रन, जे. जयललिता यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत विजय हे सिनेक्षेत्रातून राजकारणात दाखल झाले. एम. करूणानिधी हे देखील सिनेमाची स्क्रिप्ट लिहित असत. पुद्दुचेरीत भाजपा प्रणित एनडीए सत्तेत पुन्हा येण्याच्या मार्गावर आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघातून उदयनिधी स्टॅलिन ४,१०३ मतांनी आघाडीवर आहेत. एकूण १७ फेऱ्यांपैकी ११ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून, टीव्हीके (TVK) पक्षाचे सेल्वम डी. त्यांना जोरदार टक्कर देत आहेत.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: भाजपाकडून रिंगणात उतरलेले तमिळनाडू भाजपा प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, माजी राज्यपाल पिछाडीवर
तामिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन, माजी राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन आणि केंद्रीय मंत्री एल. मुरूगन हे पिछाडीवर आहेत. डीएमके व टीव्हीके पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपाच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून ते सध्या पिछाडीवर आहेत.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आठ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर
तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे नेते व मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे सध्या पिछाडीवर आहेत. अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. कोलाथूर मतदारसंघात ही लढत होत असून स्टॅलिन हे ८०४८ मतांनी पिछाडीवर आहेत. टीव्हीकेचे उमेदवार विजय बाबू सध्या आघाडीवर आहेत.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: तामिळनाडूचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पिछाडीवर, टीव्हीके उमेदवाराने घेतली आघाडी
तमिळनाडूत टीव्हीके व डीएमके पक्षात चुरस रंगलेली असताना काँग्रेस मात्र मागे पडली आहे. तामिळनाडू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. सेल्वापेरूंथगाई हे पिछाडीवर आहेत. टीव्हीकेचे उमेदवार थेन्नारासू यांनी १४०८६ मतांनी आघाडी घेतली आहे. श्रीपेरुंबुदूर मतदारसंघात ही लढत झाली होती.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: विजय तमिळनाडूसाठी चांगले काम करतील, टीव्हीके पक्षाचे समर्थक
तमिळनाडूत तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे प्रमुख व अभिनेते विजय हे तामिळनाडूसाठी चांगले काम करतील, जर त्यांनी चांगले काम केले नाही, तर त्यांना पुढच्या निवडणुकीत पाडू, असे टीव्हीके पक्षाच्या एका समर्थकाने म्हटले आहे.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: "प्रचंड मोठी भावनिक लाट", टीव्हीके पक्षाचा उमेदवार काय म्हणाला?
Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live Updates: "थलपती विजय यांच्या बाजूने ही प्रचंड मोठी भावनिक लाट होती, यातून विजय यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेले प्रेम दिसून आले. लोक थलपती विजय यांच्याबरोबर अत्यंत भावनिकरित्या जुळलेले आहेत", असे तमिळनाडूतील विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे उमेदवार कनिमोझी संतोष यांनी म्हटले आहे.
Assembly Election Results 2026 LIVE: Kerala, Tamil Nadu & Puducherry trends for LDF, UDF, DMK, AIADMK and NDA

केरळ, तामिळनाडू व पुडुचेरी निवडणूक निकाल २०२६ लाईव्ह: LDF vs UDF, DMK vs AIADMK ट्रेंड्स, विजेत्यांची यादी
