Kerala Truck Accident : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं आपण पाहतो. यामध्ये अनेकदा अपघाताचे देखील व्हिडीओ व्हायरल होतात. अपघाताचे काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. आता देखील अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला अगदी मृत्यूच्या दारातून परत आली आहे. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असं म्हटलं जातं ना, अगदी तसंच या व्हिडीओत दिसतं आहे. हा व्हिडीओ खरं तर काळजाचा थरकाप उडवणारा आहे.
झालं असं की, केरळमधील कोझिकोड शहरात एका अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. एका ट्रकने एका दुचाकीवरील महिलेला चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे.
या अपघातातून दुचाकीवरील महिलेचा जीव वाचला आहे. या ट्रक चालकाबाबत अनेकांनी संतप्त प्रक्रिया दिल्या आहेत. पेरिंगलम शहरापासून कोझिकोड मेडिकल कॉलेजकडे एक रोड जातो. या रोडवरील एका चढावरून हा ट्रक पुढे जात होता. मात्र, ट्रक पुढे जात असताना अचानक रिव्हर्स आल्याचं व्हिडीओत दिसत आहे. याचवेळी त्या ट्रकच्या पाठिमागे दुचाकीवरून जात असलेली एका महिलेल्या या ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न केला.
पण महिलेचं दैव बलवत्तर म्हणून महिला अगदी थोडक्यात बचावली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडली. मात्र, ट्रकच्या खाली महिलेची गाडी सापडल्याने गाडीचा चक्काचूर झाला. ती ट्रक पाठिमागे रिव्हर्स जाऊन एका झाडाला जाऊन धडकते आणि नंतर थांबते. खरं तर फक्त एका इंचाने दुचाकीवरील महिलेचा जीव वाचल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
केरल के कोझिकोड का ये वीडियो देखिये, मौत आई और छूकर निकल गई
ढलान होने की वजह से ट्रक पीछे लुढ़क गया और स्कूटी सवार महिला पीछे थी, वो ट्रक की चपेट में आ गई
महिला का बचना किसी चमत्कार से कम नहीं था
तभी कहा गया है- जाको राखे ईश्वर, मार सके न कोय.#viralvideo #keral pic.twitter.com/1hcbjQrFYLThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Himanshi Singh (@Himanshi199712) May 16, 2025
दरम्यान, या अपघातातील महिलेला किरकोळ दुखापत झाली असून तिला स्थानिकांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा तपास करत असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघाताबाबत समोर आलेल्या प्राथमिक अहवालात ट्रकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.