Keral Women Tragedy: केरळच्या वायनाड जिल्ह्यात जुलै महिन्यात भीषण भूस्खलन होऊन शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेतून वायनाड अद्याप सावरलेले नसताना २४ वर्षीय श्रुतीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. वायनाड भूस्खलन दुर्घटनेत श्रुतीने आपले संपूर्ण कुटुंब गमावले होते. त्यानंतर आता तिच्या जोडीदाराचाही अपघातात मृत्यू झाला आहे. श्रुतीचा साखरपुडा जेन्सन नामक युवकाशी झाला गहोता. बुधवारी रात्री अपघातामुळे त्याचे निधन झाले. श्रुतीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून केरळमध्ये तिच्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. मूपेन वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवक्त्यांनी जेन्सनच्या निधनाबद्दल अधिकृत माहिती दिली. बुधवारी रात्री ८.३० वाजता जेन्सनचा मृत्यू झाला. अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मेंदूत रस्तस्त्राव, तसेच इतर जबर दुखापतीमुळे जेन्सनच्या शरीरातून अति रक्तस्त्राव झाला होता. ज्यामुळे त्याला वाचविण्यात अपयश आले.

Adani Faces Challenges in Kenya| Kenya Workers Strike Against Adani Project
Adani Airport Project in Kenya: “अदाणी’ला जावंच लागेल”, केनियामध्ये शेकडो कामगार रस्त्यावर उतरले; आंदोलन संपूर्ण नैरोबीत पसरलं!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Army officers assaulted and woman gangraped madhya pradesh
Army officers friend gangraped: धक्कादायक! मध्य प्रदेशमध्ये लष्कराच्या जवानासमोरच त्याच्या मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार
Anil Mehta made last calls to Daughters Malaika Arora
“मी थकलोय…”, लेक मलायका अरोराला फोन करून आत्महत्येआधी काय म्हणाले होते अनिल मेहता? माहिती आली समोर
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
Bengaluru Mahalaxmi Murder Updates in Marathi
Bengaluru Murder : “फ्रिजमध्ये माझ्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे पाहिले आणि…”, बंगळुरुत हत्या झालेल्या महालक्ष्मीच्या आईने काय सांगितलं?

हे वाचा >> Wayanad landslides Neethu Jojo: केरळमध्ये भूस्खलन होताच पहिली सूचना देणाऱ्या निथू जोजो यांचा करूण अंत, दुसऱ्या भूस्खलनात झाला दुर्दैवी मृत्यू

मंगळवारी जेन्सच्या वाहनाची एका खासगी बसला धडक बसली होती. श्रुती आणि जेन्सच्या कुटुंबातील काही सदस्य यावेळी वाहनातच होते. त्यांना किरकोळ दुखापत झाल्यामुळे ते सर्व अपघातातून वाचले. जेन्सनला वाचविण्याचे अनेक प्रयत्न करूनही त्याला वाचविता आले नाही. जेन्सन कार क्लिनिंग करण्याच्या कंपनीत काम करत होता.

वायनाड दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब संपलं

३० जुलै रोजी वायनाड येथे भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेत श्रुतीच्या कुटुंबातील नऊ सदस्यांचे निधन झाले. या दुर्घटनेत श्रुतीच्या जवळचा एकही नातेवाईक वाचू शकला नाही. या कठीण काळात फक्त जेन्सनच श्रुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. दोघांचे दशकभरापासून प्रेमसंबंध होते. त्यांनी २ जून रोजी साखरपुडा केला होता. मात्र अवघ्या काही महिन्यात श्रुतीच्या आयुष्यातील जवळची माणसं हरपली.

मल्याळम आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता फहाद फासिलनेही जेन्सनचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त केली.

हे ही वाचा >> Wayanad Landslide: इथे माणुसकीही हरवली! भूस्खलन झाल्यानंतर घर सोडलेल्यांच्या घरात चोरी

श्रुती आणि जेन्सनने डिसेंबर महिन्यात मोठ्या थाटामाटात लग्न करण्याची योजना आखली होती. मात्र भूस्खलनात श्रुतीने स्वबळावर बांधलेले नवीन घर, चार लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल गाळाबरोबर वाहून गेला. याबरोबरच घरातील नऊ आणि आजूबाजूच्या परिसरातील २०० माणसं मृत्यूमुखी पडले. या घटनेमुळे हादरलेल्या श्रुती आणि जेन्सनने सप्टेंबर महिन्यात अतिशय साध्या पद्धतीने नोंदणी करत विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.

आणखी वाचा >> Wayanad landslide : वायनाड येथील भूस्खलनाची कारणे काय? संशोधकांनी नोंदवले निरीक्षण

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ही बातमी अतिशय क्लेशदायक आहे. या नुकसानाची भरपाई न करता येण्यासारखी आहे. श्रुती केरळ राज्य तुझ्या पाठीशी आहे, एवढेच सांगू शकतो. या दुःखातून सावरण्याचे तुला बळ मिळो.”