scorecardresearch

मोदींविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याने युवकाला अटक!

इंटरनेटच्या महाजालातील फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रे टाकल्याप्रकरणी केरळमध्ये एका युवकाला अटक करण्यात आली आहे.

इंटरनेटच्या महाजालातील फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रे टाकल्याप्रकरणी केरळमध्ये एका युवकाला अटक करण्यात आली आहे.
केरळमधील कोलाम जिल्ह्यात मंगळवारी स्थानिक पोलीस ठाण्यात संघाच्या कार्यकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार राजेश नावाच्या युवकाला मोदींबद्दल आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर टाकल्याने अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशने फेसबुकवर मोदींच्या चेहऱयावर चप्पल छापल्याचे छायाचित्र शेअर केले आहे तसेच मोदींविरोधात अपमानास्पद टिपण्णी केली आहे. या टिपण्णीमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अंतर्गत ६६(अ) आणि ६७ नुसार कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kerala youth arrested for posting abusive facebook comments against modi