रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी लोकसभेत २०१६-१७ साठीचा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ न करता सर्व सामान्यांना प्रभूंनी दिलासा दिलाच पण यासोबतच कोणत्याही मोठ्या घोषणा न करता मागील रेल्वे अर्थसंकल्पाप्रमाणेच पायाभूत सुविधांच्या सुधारणांवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे-

  • फक्त भाडे वाढवून उत्पन्न वाढणार नाही. इतर उत्पन्नाचेही स्त्रोत शोधण्याचे प्रयत्न
  • यंदा रेल्वेत गुंतवणूक दुपटीने वाढवणार.
  • २०२० पर्यंत स्वयंचलित रेल्वेफाटक करण्याचे लक्ष्य.
  •  पॅसेंजर गाड्यांचा वेग ताशी ८० किमी करण्यावर भर.
  • सध्या दररोज १३ किमीचा रेल्वेमार्ग तयार केला जातोय.
  •  कामात पारदर्शकता आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार.
  •  रेल्वेचे पूर्ण विद्युतीकरण करण्यावर भर.
  •  श्रीनगरला रेल्वेमार्गांनी जोडण्याचे काम लवकरच पूर्ण करणार.
  •  वाराणसी ते दिल्ली नवी रेल्वेसेवा सुरू होणार.
  •  ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत देशात रेल्वेचे दोन कारखाने सुरू करणार.
  •  आता जनरल बोगीमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा.
  •  दोन वर्षांत ४०० रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा.
  •  ई-तिकीट दोन मिनिटात २ हजार ऐवजी ७ हजार काढता येणार.
  •  महिलांच्या २४ तास सुरक्षेसाठी सक्षम हेल्पलाईन.
  •  तिकीटाच्या रांगा कमी करण्यासाठी प्रयत्न करणार.
  •  वडोदरा रेल्वे विश्व विद्यालयाची स्थापना करणार.
  •  येत्या काळात सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्यासाठी प्रयत्नशील.
  •  ४०० स्थानकांचा विकास पीपीपी तत्त्वावर करणार.
  •  आर्थिक मंदीतही रेल्वेचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न.
  •  कचरा दिसल्यास तातडीने बोगीची स्वच्छता करण्याची मागणी करता येणार.
  •  स्थानिक खाद्य पदार्थ हवे असल्यास मोठ्या स्थानकांवर ते उपलब्ध होणार.
  •  प्लॅटफॉर्मच्या कुलीला यापुढे सहाय्यक म्हणून संबोधण्यात येणार.
  •  चर्चगेट-विरार, सीएसटी-पनवेलसाठी ‘एलिव्हेटेड कोरिडोअर’ला प्राधान्य.
  •  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला सुरूवात, सुरेश प्रभूंची लोकसभेत माहिती.
  •  सामान्यांसाठी अनारक्षित गाड्या सुरू करणार.
  •  मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांची उंची वाढवणार.
  •  रेल्वे प्रवासादरम्यान विमा उतरवता येण्याची सुविधा उपलब्ध होणार.
  •  रेल्वेच्या प्रकल्पांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि जीपीएस सिस्टीमचा वापर करणार.
  •  डब्यांची क्षमता वाढविण्यासाठी अभ्यास करून सुधारणेवर भर.
  •  १ लाख २१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य.
  •  तीर्थस्थळ स्थानकांवरील सुविधा अधिक संपन्न करणार.
  •  रेल्वे ट्रॅकवरील आंदोलनांमुळे रेल्वेचे मोठे नुकसान.
  •  चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत मार्गाच्या कामाला तातडीने सुरूवात
  •  ताशी १३० किमी वेगाची तेजस रेल्वे सुरू होणार.
  •  गाड्यांमधून मलमूत्र विसर्जन थांबवणार.
  •  जेवणाची सोय असलेली ‘हमसफर’ रेल्वे सुरू करणार.
  •  रेल्वेच्या प्रवासी दरात कोणतीही वाढ नाही.