Premium

Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!

कॅनडातील भारतीयांना देश सोडून पुन्हा भारतात परतण्याची धमकी गुरपतवंत सिंग पन्नूनं दिली आहे.

gurupatwant singh pannu residence raid
चंदीगडमध्ये गुरुपतवंत सिंग पन्नूच्या घरावर एनआयएचा छापा! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणाचे पडसाद जागतिक स्तरावर उमटू लागले आहेत. अमेरिका-ऑस्ट्रेलियानं कॅनडाची बाजू घेतली असून भारतानं तपासात सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचवेळी भारतानं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हरदीप सिंग निज्जरसह कॅनडात भारत विरोधी कारवाया करणाऱ्यांची यादीच एनआयएनं दोन दिवसांपूर्वी जारी केली होती. आता एनआयएनं कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या चंदीगडमधील घरावर छापा टाकून जप्तीची कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडलंय आत्तापर्यंत?

जून महिन्यात हरदीप सिंग निज्जरची हत्या झाल्यानंतर त्याचा तपास कॅनडानं सुरू केला. चार दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशाच्या संसदेत बोलताना या हत्येमध्ये भारत सरकारचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप केला. या प्रकरणामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारतानं कॅनडातील व्हिसा केंद्रही तात्पुरत्या स्वरूपात बंद केलं आहे.

एकीकडे द्विपक्षीय राजनैतिक संबंध ताणले गेले असताना कॅनडात खलिस्तान समर्थनार्थ काम करणाऱ्या संघटना अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यापैकीच एक असणाऱ्या सिख फॉर जस्टिस संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नूभोवती एनआयएनं फास आवळायला सुरुवात केली आहे. गुरपतवंत सिंग पन्नूनं जाहीरपणे भारतीय नागरिकांना धमकावल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. पन्नू जाहीर कार्यक्रमांमधून कॅनडामधील भारतीयांना भारतात निघून जाण्याची धमकी देत असताना कॅनडा सरकारकडून त्यावर ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ असल्याचं सांगत कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही.

Video: “जे अमेरिकेनं लादेनबाबत केलं, तेच भारतानं…”, कॅनडाच्या आरोपांवर माजी अधिकाऱ्या…

NIA ची धडक कारवाई

कॅनडा सरकार जरी गुरपतवंत सिंग पन्नूवर कारवाई करत नसलं, तरी भारतातील तपास यंत्रणा असणाऱ्या NIA नं पन्नूविरोधात फास आवळायला सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळीच एनआयएनं चंदीगडमधील गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरावर छापा टाकला. चंदीगडच्या सेक्टर १५ मध्ये पन्नूचं घर आहे. या घरावर एनआयएनं जप्तीची नोटीसही लावली आहे. यासाठी एनआयएनं विशेष न्यायालयाची परवानगी घेऊन ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Khalistan supporter gurpatwant singh pannu residence confiscated by nia amit canada allegations on india pmw

First published on: 23-09-2023 at 15:47 IST
Next Story
“नवीन संसदेला ‘मोदी कॉम्प्लेक्स’ म्हटलं पाहिजे”, काँग्रेसच्या टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर; म्हणाले…