scorecardresearch

Premium

“खलिस्तानी दहशतवादी पन्नूला करायचे आहेत भारताचे तुकडे आणि…”, NIA च्या सूत्रांनी दिली ‘ही’ माहिती

NIA च्या सूत्रांनी नेमकी काय दिली माहिती? जाणून घ्या सविस्तर बातमी

Khalistani Terrorist Wants To Divide India
पन्नू सिंग बाबत काय म्हटलं आहे NIA ने? (फोटो सौजन्य-ट्विटर)

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत नवी माहिती मिळवली आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांविषयी तयार करण्यात आलेल्या दस्तावेजाता अनेक दहशतवाद्यांची नावं आहेत. हे सगळे खलिस्तानी दहशतवादी भारताच्या विरोधात कारवाया करत असल्याचं समोर आलं आहे. या दस्तावेजात सुरक्षा यंत्रणांनी गुरुपतवंत सिंग पन्नूचं नावही समाविष्ट केलं आहे. भारताचे अनेक तुकडे पन्नूला करायचे आहेत अशी माहिती एनआयच्या सूत्रांनी दिली आहे.

NIA च्या दस्तावेजात काय माहिती?

दस्तावेजात दिलेल्या माहितीनुसार पन्नूवर १६ केसेस दाखल आहेत. ही प्रकरणं दिल्ली, पंदाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंड या ठिकाणी हे गुन्हे आहेत. १९४७ मध्ये पन्नू पाकिस्तानातल्या खानाकोट गावातून अमृतसरला आला होता. त्याने पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ भगवंत सिंग हा विदेशात राहतो. अमेरिकेतल्या फुटिरतावादी शिख ग्रुपचा तो प्रमुख आहे. त्याने आत्तापर्यंत अनेकदा भारताचे तुकडे करणार असल्याची भाषा केली आहे.

Haryana-BJP-leader-Birendra-Singh
इंडिया आघाडी एकजुटीने लढली, तर भाजपाला मिळेल कडवी झुंज; भाजपा नेत्याचे स्पष्टीकरण
UP ATS arrests former contract Army employee
ISI ला २ हजार रुपयांसाठी विकली भारतीय लष्कराची माहिती, पाकिस्तानी तरुणीशी फोनवर अश्लील गप्पा मारणाऱ्या तरुणाला ATS ने केली अटक
canada s allegations against india based on indian officials communications
भारताविरुद्धच्या आरोपाला गुप्तचर माहितीचा आधार? कॅनडातील माध्यमांचे वृत्त
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
बंडखोरांच्या अपात्रतेबाबतच्या घडामोडींना वेग, दिल्लीतील भेटीगाठीवर राहुल नार्वेकर म्हणाले…

भारताच्या गृह मंत्रालयाने पन्नू सिंगला केलं दहशतवादी घोषित

७ जुलै २०२२ रोजी भारताच्या गृहमंत्रालयाने पन्नू सिंगला दहशतवादी घोषित केलं. दस्तावेजातल्या माहितीनुसार पन्नू सिंगला भारताचे तुकडे तुकडे करायचेे आहेत आणि छोट्या राज्यांऐवजी छोटे देशांची निर्मिती करायची आहे. धर्माच्या आधारावर हे विभाजन झालं पाहिजे अशी त्याची मागणी आहे. त्याला एक मुस्लिम राष्ट्र तयार करायचं आहे, त्याचं नाव त्याला डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ उर्दूस्तान असं ठेवायचं आहे. काश्मीर भारतापासून वेगळं करण्यासाठीही त्याचे प्रयत्न सुरु आहेत.

पन्नू सिंग हा अनेकदा भारतात व्हॉईस मेसेज पाठवत असतो. भारताच्या एकतेला त्याने अनेकदा आव्हान दिलं आहे. दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल आणि हरयाणा या राज्यांमध्ये त्याने खलिस्तानी पोस्टर्स आणि झेंडे दाखवण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. भारतातल्या विविध राज्यांमधून त्याच्या हस्तकांना अटक करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Khalistani terrorist wants to divide india create many countries said sources scj

First published on: 25-09-2023 at 15:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×