khan sir suresh abdul video goes viral congress demand to take action spb 94 | Loksatta

Suresh Abdul Video : खान सरांचा जुना व्हिडीओ व्हायरल; कडक कारवाईची काँग्रेसची मागणी

पाटण्यातील शिक्षक खान सर यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, त्यांचा असाच एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

Suresh Abdul Video : खान सरांचा जुना व्हिडीओ व्हायरल; कडक कारवाईची काँग्रेसची मागणी
फोटो सौजन्य – द इंडियन एक्सप्रेस

पाटण्यातील शिक्षक खान सर हे त्यांच्या शिकवण्याच्या शैलीमुळे कायम चर्चेत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, त्यांचा असाच एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत खान सर ‘सुरेश’ आणि ‘अब्दुल’ या नावांनी वाक्याचा अर्थ कसा बदलतो, हे सांगण्याचा प्रयत्न आहेत. दरम्यान, काँग्रेसने या व्हिडीओवर आक्षेप घेत खान सर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – इराणचे ‘नैतिकता पोलीस दल’ बरखास्त; हिजाबसक्तीविरोधात दोन महिन्यांच्या हिंसक आंदोलनानंतर निर्णय

खान सरांच्या ‘सुरेश-अब्दुल’ व्हिडीओवरून यापूर्वीसुद्धा वाद झाला आहे. मात्र, मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एका शिक्षकाने मुस्लीम विद्यार्थ्याला ‘दशहतवादी’ म्हटल्याने हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओत खान सर द्वंद्व समास शिकवत असताना नाव बदलल्याने वाक्याचा अर्थ कसा बदलतो, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘सुरेशने विमान उडवले’ आणि ‘अब्दुलने विमान उडवले’ या दोन्ही वाक्यातील शब्द सारखे असून या वाक्याचा अर्थ बदलत असल्याचे म्हणत आहेत.

हेही वाचा – धक्कादायक! दिल्लीमध्ये लिव्ह इन पार्टनरचा खून, ४ दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला पंजाबमध्ये अटक

या व्हिडीओवर काँग्रेसने नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी आक्षेप घेत, खान सर यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. तसेच हा व्हिडीओत जे लोकं हसत आहेत, त्यांनी विचार करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – दुख:द! साईंच्या चरणी नमस्कार करण्यासाठी वाकला अन् हृदयविकाराचा झटका आला; तरुणाचा मृत्यू

सोशल मीडियावरील अनेकांनी खान सरांचे समर्थनही केले. खान सरांची विधान व्यंग्यात्मक असून या व्हिडिओचा फक्त काही भाग शेअर केला जात असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 12:15 IST
Next Story
लालूप्रसाद यादव यांच्यावर आज सिंगापूरमध्ये शस्त्रक्रिया, मुलगी देणार किडनी; शेअर केला रुग्णालयातील फोटो