जम्मू-काश्मीर: पुलवामा येथील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा, शस्त्रास्त्रे जप्त

सुरक्षादलांनी दहशतवाद्यांकडील मोठ्याप्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

प्रतिकात्मक छायाचित्र

जम्मू-काश्मीर मधील पुलवामा येथे सुरक्षादलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवारी रात्री उशिरा अवंतीपुरा परिसरात लष्कराने शोध मोहीम सुरु केली होती. यावेळी झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. सुरक्षादलांनी दहशतवाद्यांकडील मोठ्याप्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान, जम्मू- काश्मीरमधील पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणात सामील असलेल्या दहशतवाद्याचा सुरक्षा दलांनी चकमकीत खात्मा केला आहे. नावीद जट्ट असे या दहशतवाद्याचे नाव असून तो मूळचा पाकिस्तानचा आहे. अबू हंजाला उर्फ नावीद जट्ट हा काही महिन्यांपूर्वी श्रीनगरमधील रुग्णालयातून पळाला होता.तो लष्कर- ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनेत सक्रीय होता.

शुजात बुखारींची जून महिन्यात ईदच्या दोन दिवस अगोदर हत्या झाली होती. ‘प्रेस एनक्लेव’ या वृत्तपत्राच्या कार्यालयातील काम आटपून कारमध्ये बसत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. बुखारींची हत्या करणारे तीन पैकी दोन मारेकरी हे दक्षिण काश्मीरचे तर तिसरा मारेकरी हा पाकिस्तानचा असल्याची माहिती जम्मू- काश्मीर पोलिसांच्या तपासातून समोर आली होती. या दहशतवाद्याचे नाव अबू हंजाला उर्फ नावीद जट्ट असे होते. त्याला २६ ऑगस्ट २०१४ रोजी अटक झाली होती. मात्र, जानेवारीत श्रीनगरमधील रुग्णालयातून पळाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Khrew encounter pulwama two terrorists have been killed

ताज्या बातम्या