Kiren Rijiju Pawan Khera Swimming Video : “आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि त्यांच्या पत्नी रिनिकी भुयान सरमा यांची विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचारादरम्यान खोटे आरोप करण्यात आले, त्याचं बक्षिसी म्हणून काँग्रेस नेते पवन खेरा यांना राज्यसभेची जागा देण्यात आली”, असा आरोप संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे.
एका पोहण्याच्या व्हिडिओवरून आणि रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरून वाद सुरू झाला होता. याबाबत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दुपारी ‘X’ वर पोस्ट केलं, “२ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी मला सांगितलं की राहुल गांधींनी पवन यांना आसाम निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी हिमंता बिस्वा सरमा आणि रिनिकी यांच्यावर खोटे आरोप करण्यास सांगितलं होतं. जेव्हा हा खोटारडेपणा अंगलट आला, तेव्हा खेरा यांना बक्षीस म्हणून राज्यसभेची जागा देण्यात आली, ज्यासाठी ते पात्र नाहीत!”
खेरा यांनी राज्यसभेत कसा प्रवेश केला?
पवन खेरा हे जून महिन्यात काँग्रेसचे शासन असलेल्या कर्नाटकातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि मन्सूर अली खान हे देखील याच फेरीत राज्यातून पुन्हा निवडून आले, तर भाजपाचे एम. नागराज हेही बिनविरोध निवडून आले. मंगळवारी केलेल्या एका पोस्टमध्ये रिजिजू यांनी खेरा यांचा उल्लेख काँग्रेसने नामांकित केलेले नेते असा केला होता. जूनमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खेरा म्हणाले होते, “पक्ष नेतृत्व, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी मला ही संधी दिली आणि मी त्यांचा ऋणी आहे.”
वाद नेमका कसा सुरू झाला?
हा वाद रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशातील एका नदीत पोहतानाचा स्वतःचा व्हिडिओ पोस्ट केल्याने सुरू झाला, ज्यामध्ये त्यांनी कथितपणे राहुल गांधींना अशाच प्रवाहात पोहण्याचे आव्हान दिले होते. रिजिजू आणि राहुल गांधी यांच्यात तंदुरुस्ती (फिटनेस) हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे, राहुल गांधींनी तर त्यांना एकत्र सराव करण्याचा सल्लाही दिला होता. यावर खेरा यांनी २५ ऑगस्ट रोजी उत्तर दिले, “विचार करा राहुल गांधींनी भाजपाच्या मनावर किती ताबा मिळवला आहे. एकीकडे किरेन रिजिजू राहुल गांधींचं नाव घेतल्याशिवाय अर्धवट कपड्यांमध्ये पोहायलाही जाऊ शकत नाहीत.
