scorecardresearch

Premium

VIDEO: भर मंचावर काँग्रेसच्या महिला आमदारावर चाकूने हल्ला, हल्लेखोर युवक ताब्यात

काँग्रेसच्या महिला आमदारावर चाकूहल्ला करण्यात आला आहे.

Congress
संग्रहित फोटो

छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यात एका महिला आमदारावर चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित महिला आमदार रविवारी एका भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. दरम्यान, व्यासपीठावर अचानक आलेल्या एका युवकाने त्यांच्यावर चाकुने हल्ला केला. या हल्ल्यात आमदारांच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्वरित आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे.

खिलेश्वर असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनांदगाव जिल्ह्याच्या खुज्जी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार छन्नी चंदू साहू या डोंगरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोधरा गावात एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला.

TMC-leader-and-Minister-Rathin-Ghosh
ईडीचा कचाट्यात तृणमूल काँग्रेसचा आणखी एक मंत्री; ममता बॅनर्जींच्या विश्वासू नेत्यावर कारवाई
lokmanas
लोकमानस : हे भाजपच्या कीर्तीला साजेसेच!
punjab_congress
पंजाब : ड्रग्ज तस्करी प्रकरणात काँग्रेसच्या आमदाराला अटक, आप-काँग्रेसमधील संघर्ष वाढणार?
Samajwadi-Party-in-Chhattisgarh-Assembly-Election
समाजवादी पक्षाचा ‘इंडिया’ आघाडीत खोडा? छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारच्या विरोधात ४० जागा लढविणार

हेही वाचा- “दंगली घडवणं हे भाजपाचं कटकारस्थान”, चंद्रकांत खैरेंचं मोठं विधान

प्राथमिक माहितीनुसार, आमदार साहू व्यासपीठावर असताना कथित नशेत असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात साहू यांना मनगटावर किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर त्यांना तातडीने चुरिया येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. येथे साहू यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, छत्तीसगडमधील विरोधी पक्ष भाजपाने या घटनेचा निषेध केला असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? हे भूपेश बघेल सरकारचे अपयश आहे, अशी भाजपाने टीका केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Knife attack on congress mla chhanni chandu sahu in chhattisgrah rmm

First published on: 21-08-2023 at 09:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×