मुंबईत पेट्रोल शंभरीजवळ! जाणून घ्या आजचे ताजे दर

मे महिन्यात आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ११ दिवस वाढ करण्यात आली

(संग्रहित छायाचित्र)

करोना संकटात सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. इंधनाच्या दरात वाढ सुरूच आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज (मंगळवार) तेल विपणन कंपन्यांनी किरकोळ इंधनाचे दर वाढविले आहेत. सोमवारी किंमती स्थिर ठेवण्यात आल्या, तर रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. मे महिन्यात आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ११ दिवस वाढ करण्यात आली आहे. आज पेट्रोलमध्ये २९ ते ३१ पैसे तर डिझेलमध्ये २७ ते २९ पैशांची वाढ झाली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलची विक्रमी किंमतीत विक्री होत आहे. त्याचबरोबर आजच्या वाढीनंतर मुंबईत पेट्रोल १०० च्या जवळ पोहोचले आहे.

काय आहेत आजचे दर

दिल्लीत पेट्रोलची किंमत ९२.८५ रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ८३.५१ रुपये झाले आहे. मुंबईत विक्रमी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल ९९.१४ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९०.७१ रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९४.५४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८८.३४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९२.९२ रुपये तर डिझेलची किंमत ८६.३५ रुपये प्रतिलिटर झाली आहे.

देशात तेलाच्या दरात दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. कारण देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजेपासून लागू आहेत.

आपल्या फोनवरून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Know today latest rates of petrol srk