या आठवड्यात इंटरनेटवर एका बातमीची खूप चर्चा झाली. स्वीडन देशात जूनमध्ये सेक्स चॅम्पियनशिप आयोजित केली जाणार असल्याचे वृत्त आले आणि ते व्हायरल झाले. यासंदर्भात ट्विटरवर सर्वात आधी चर्चा सुरू झाली होती. ८ जूनपासून ही चॅम्पियनशिप होणार असल्याचंही त्यात म्हटलं होतं. पण, आता मात्र यासंदर्भात वेगळीच माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

स्वीडिश सेक्स फेडरेशन पहिल्या युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करणार असून गोटेन्बर्ग या शहरात ही चॅम्पियनशिप पार पडणार असल्याचे वृत्त समोर आले होते. ही चॅम्पियनशिप ८ जून रोजी सुरू होईल आणि अनेक आठवडे चालेल, ज्यामध्ये सहभागी दररोज सहा तास स्पर्धा करतील, असंही त्यात म्हटलं होतं. पण, ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही बातमी खोटी आहे. स्वीडिश न्यूज आउटलेट गोटरबॉर्ग्स-पोस्टनच्या म्हणण्यानुसार, या वर्षी एप्रिलमध्ये यासंदर्भातला प्रस्ताव नाकारण्यात आला आहे.

हेही वाचा – दुसऱ्या लग्नाचा निर्णय सांगितल्यावर पहिली पत्नी व २२ वर्षांच्या मुलाची ‘अशी’ होती प्रतिक्रिया, आशिष विद्यार्थींचा खुलासा

स्वीडिश आउटलेटच्या वृत्तानुसार, स्वीडिश देशात एक ‘फेडरेशन ऑफ सेक्स’ आहे आणि त्याचे प्रमुख ड्रॅगन ब्रॅक्टिक यांनी चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी लैंगिक संबंधांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम हे कारण दिलं होतं. पण, फेडरेशनचा अर्ज नाकारण्यात आला, असं गोटरबोर्ग्स-पोस्टनने त्यांच्या २६ एप्रिलच्या अहवालात म्हटलं आहे.

व्हायरल पोस्ट –

ब्रॅक्टिक यांनी या वर्षी जानेवारीमध्ये यासंदर्भात अर्ज सादर केला होता. “हे आमच्या आवश्यकता पूर्ण करत नाही आणि त्यामुळे तुमचा अर्ज नाकारण्यात आला आहे. आमच्याकडे इतर भरपूर कामं आहेत,” असं क्रीडा महासंघाचे प्रमुख ब्योर्न एरिक्सन यांनी अर्ज नाकारताना म्हटलं होतं.

या चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धकांना दररोज सहा तास स्पर्धा करावी लागेल. सहभागी स्पर्धकांना सामने किंवा अॅक्टिव्हिटीजसाठी अंदाजे ४५ मिनिटं ते एक तास वेळ दिला जाईल, असंही त्यात म्हटलं गेलं होतं, पण स्वीडनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Story img Loader